Pune-Solapur passenger shut down : लोणी काळभोर : दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे रेल्वेला सध्या मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. मात्र आता दिवाळीच्या सुट्ट्या संपत आल्याने कर्मचारी, विद्यार्थी, नोकर चाकर हे आपापल्या घरी माघारी चालले आहेत. त्यातच पुण्याकडून सोलापूरच्या दिशेकडे जाणाऱ्या पुणे-सोलापूर पॅसेंजर (डिझेल मल्टिपल युनिट) गाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे रेल्वेगाडी लोणी (ता. हवेली) स्थानकात रविवारी (ता.१९) तब्बल एक तास जागच्या जागी उभी होती. दरम्यान, पुणे-सोलापूर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चांगलाचा मनस्ताप सहन करावा लागला आहे.
पुणे-सोलापूर पॅसेंजर दैनंदिन प्रवासी वाहतूक करते. नेहमीप्रमाणे पॅसेंजर पुण्यातून वेळेवर सोलापूरच्या दिशेने मार्गस्थ झाली. पुणे सोलापूर पॅसेंजरचे रविवारी (ता.१९) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास लोणी रेल्वे स्थानकात पोचली. तेथून काही मिनिटांत निघताना इंजिनमध्ये बिघाड झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्यानंतर चालकाने तातडीने ही बाब रेल्वे प्रशासनाला कळविली. त्यानंतर रेल्वे नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांनी इंजिन तज्ञांशी संपर्क केला. व तज्ञांनी पॅसेंजर चालकाला ऑनलाईन मार्गदर्शन केले. त्यानंतर पॅसेंजर सव्वा दहाच्या सुरु झाली. त्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा मोकळा श्वास घेतला.
लोणी स्थानकातून रेल्वे एक तासाच्या खोळंब्यानंतर सोलापूरच्या दिशेने सव्वा दहाच्या सुमारास मार्गस्थ झाली. मात्र पुणे-सोलापूर पॅसेंजरचे अचानक इंजिन बंद पडल्याने याचा फटका प्रवाशांना बसला आहे. या सर्व प्रक्रियेत तब्बल एक तास रेल्वे लोणी स्थानकात जागच्या जागी उभी ठेवावी लागली. त्यामुळे पुणे-सोलापूर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चांगलाचा मनस्ताप सहन करावा लागला आहे.
दरम्यान, पॅसेंजरच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने पॅसेंजर लोणी स्थानकात तब्बल एक तास उभी होती. या दरम्यान प्रवास्यांना गाडी इतका वेळ का थांबली आहे. याची माहिती मिळत नव्हती. त्यामुळे प्रवास्यांमध्ये एकच गोंधळ उडाला होता. मात्र लोणी स्टेशन प्रबंधक एस.एस.सोनपरोटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी योग्य परिस्थिती हाताळून प्रवास्यांना योग्य सूचना दिल्या. त्यामुळे प्रवास्यांचे एकाप्रकारे समाधान झाले.
रेल्वे प्रशासनाच्या भोंगळ कारभार चव्हाट्यावर
गाडी रेल्वे स्थानकात सुटण्याच्या आगोदर ती सुस्थितीत आहे का? ते पाहणे रेल्वे प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र पुण्यातून डेमो सोलापूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्यानंतर अवघे दोन स्थानके पुढे गेल्यानंतर इंजिन बंद पडल्याने रेल्वे प्रशासनाच्या भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. मात्र दुर्घटना असती तर याला जबाबदार कोण? तसेच या प्रकरणात दोषी असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई काय होणार याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे.
डेमो च्या प्रस्तावित वेळा
पुण्यातून सकाळी 8.15 वाजता निघेल आणि सोलापुरात दुपारी 3.50 वाजचा पोहचेल
सोलापूरातून रात्री 11 वाजता निघेल आणि सकाळी 6:00 वाजता पोहचेल