Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune-Solapur passenger shut down : पुणे-सोलापूर पॅसेंजर लोणी स्थानकात पडली बंद; इंजिन बिघडल्याने एक तास जागच्या जागी उभी 

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 19 November 2023, 12:04

Pune-Solapur passenger shut down : लोणी काळभोर  : दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे रेल्वेला सध्या मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. मात्र आता दिवाळीच्या सुट्ट्या संपत आल्याने कर्मचारी, विद्यार्थी, नोकर चाकर हे आपापल्या घरी माघारी चालले आहेत. त्यातच पुण्याकडून सोलापूरच्या दिशेकडे जाणाऱ्या पुणे-सोलापूर पॅसेंजर (डिझेल मल्टिपल युनिट) गाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे रेल्वेगाडी लोणी (ता. हवेली) स्थानकात रविवारी (ता.१९) तब्बल एक तास जागच्या जागी उभी होती. दरम्यान, पुणे-सोलापूर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चांगलाचा मनस्ताप सहन करावा लागला आहे.

पुणे-सोलापूर पॅसेंजर दैनंदिन प्रवासी वाहतूक करते. नेहमीप्रमाणे पॅसेंजर पुण्यातून वेळेवर सोलापूरच्या दिशेने मार्गस्थ झाली. पुणे सोलापूर पॅसेंजरचे रविवारी (ता.१९) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास लोणी रेल्वे स्थानकात पोचली. तेथून काही मिनिटांत निघताना इंजिनमध्ये बिघाड झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्यानंतर चालकाने तातडीने ही बाब रेल्वे प्रशासनाला कळविली. त्यानंतर रेल्वे नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांनी इंजिन तज्ञांशी संपर्क केला. व तज्ञांनी पॅसेंजर चालकाला ऑनलाईन मार्गदर्शन केले. त्यानंतर पॅसेंजर सव्वा दहाच्या सुरु झाली. त्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा मोकळा श्वास घेतला.

लोणी स्थानकातून रेल्वे एक तासाच्या खोळंब्यानंतर सोलापूरच्या दिशेने सव्वा दहाच्या सुमारास मार्गस्थ झाली. मात्र पुणे-सोलापूर पॅसेंजरचे अचानक इंजिन बंद पडल्याने याचा फटका प्रवाशांना बसला आहे. या सर्व प्रक्रियेत तब्बल एक तास रेल्वे लोणी स्थानकात जागच्या जागी उभी ठेवावी लागली. त्यामुळे पुणे-सोलापूर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चांगलाचा मनस्ताप सहन करावा लागला आहे.

 

दरम्यान, पॅसेंजरच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने पॅसेंजर लोणी स्थानकात तब्बल एक तास उभी होती. या दरम्यान प्रवास्यांना गाडी इतका वेळ का थांबली आहे. याची माहिती मिळत नव्हती. त्यामुळे प्रवास्यांमध्ये एकच गोंधळ उडाला होता. मात्र लोणी स्टेशन प्रबंधक एस.एस.सोनपरोटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी योग्य परिस्थिती हाताळून प्रवास्यांना योग्य सूचना दिल्या. त्यामुळे प्रवास्यांचे एकाप्रकारे समाधान झाले.

रेल्वे प्रशासनाच्या भोंगळ कारभार चव्हाट्यावर

गाडी रेल्वे स्थानकात सुटण्याच्या आगोदर ती सुस्थितीत आहे का? ते पाहणे रेल्वे प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र पुण्यातून डेमो सोलापूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्यानंतर अवघे दोन स्थानके पुढे गेल्यानंतर इंजिन बंद पडल्याने रेल्वे प्रशासनाच्या भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. मात्र दुर्घटना असती तर याला जबाबदार कोण? तसेच या प्रकरणात दोषी असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई काय होणार याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे.

डेमो च्या प्रस्तावित वेळा

पुण्यातून सकाळी 8.15 वाजता निघेल आणि सोलापुरात दुपारी 3.50 वाजचा पोहचेल
सोलापूरातून रात्री 11 वाजता निघेल आणि सकाळी 6:00 वाजता पोहचेल

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दौंड तालुक्यात जेसीबीखाली चिरडून मजुराचा मृत्यू, अपघात लपवण्यासाठी मृतदेह कारच्या डिकीतून नेऊन रस्त्यावर फेकला; गुऱ्हाळ मालकासह चौघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 3 July 2026, 13:45

कुंजीरवाडीत एफडीएची मोठी कारवाई! ‘श्री दत्त टी स्टॉल’ मधून 66 हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दुकान आणि गोदाम सीलबंद

Friday, 3 July 2026, 13:26

कुंजीरवाडीत ट्रकच्या केबिनमध्ये राडा, झोपेतून उठवल्याच्या रागातून चालकाचा घेतला चावा आणि टोकदार वस्तूने केला हल्ला

Friday, 3 July 2026, 13:13

…अखेर कदमवाकवस्ती येथील दोन वर्षांच्या सोहमच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल!

Friday, 3 July 2026, 13:00

केतन हत्या प्रकरणात मोठा खुलासा! चेतनच्या मित्राला कटाची होती आधीच माहिती; पोलिसांनी घेतले ताब्यात

Friday, 3 July 2026, 12:56

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29
Next Post

LG Bansude Vidyalaya victory in Kabaddi : सांगोला येथील कबड्डीच्या अंतिम सामन्यात एल.जी.बनसुडे विद्यालय पळसदेवचा एकहाती विजय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.