लोणी काळभोर, (पुणे) : देशभरात ७४ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. त्याचेच औचित्य साधून पुणे – सोलापूर महामार्गावरील लोणी कॉर्नर ते माळीमळा परिसरातील केलेली विद्युत खांबाना केलेली तिरंगी विद्युत रोषणाई हि लोणी काळभोरच्या सौंदर्यात भर घालीत असल्याचे प्रतिपादन यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष माधव आण्णा काळभोर यांनी केले.
लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील पुणे – सोलापूर महामार्गावर लोणी कॉर्नर ते माळीमळा परिसरात दोन किलोमीटरपर्यंत रस्त्याच्या मध्यभागी तिरंगी विद्युत स्ट्रीट लाईटचे उद्घाटन माधव काळभोर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी काळभोर बोलत होते.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य विलास काळभोर, महाराष्ट्र केसरी पैलवान राहुल काळभोर, साधना बँकेचे माजी संचालक सुभाष काळभोर, शिवदास काळभोर, हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती सनी उर्फ युगंधर काळभोर, लोणी काळभोरच्या सरपंच माधुरी काळभोर, माजी सरपंच राजाराम काळभोर, उपसरपंच भारती काळभोर, माजी उपसरपंच योगेश काळभोर, माजी उपसरपंच संगीता काळभोर, राजेंद्र काळभोर, ज्योती काळभोर, ग्रामपंचायत सदस्य नागेश काळभोर, ललिता काळभोर, युवा नेते अमित काळभोर, सागर काळभोर, युवराज काळभोर,आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, पुणे – सोलापूर महामार्गावरील लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत लोणी कॉर्नर ते माळीमळा परिसरात महामार्गाच्या मधोमध असलेल्या विद्युत खांब हे तिरंगी विद्युत रोषणाईने उजळुन निघाले आहेत. त्यामुळे जवळपास दोन किलोमीटरपर्यंत तिरंगी कायमस्वरूपी विद्युत रोषणाईने केली आहे. त्यामुळे डोळ्याचे पारणे फेडणारी विद्युत रोषणाई महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांसह स्थानिकांचे लक्ष वेधून घेत आहे.
माजी उपसभापती सनी काळभोर म्हणाले, “पुणे – सोलापूर महामार्गावर लावण्यात आलेले विद्युत खांब हे कायमस्वरूपी बनवून घेण्यात आले आहेत. त्यामुळे पुणे -सोलापूर महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना तत्काळ लक्षात येते कि लोणी काळभोर शहर आले आहे. तसेच लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत वारंवार होत असलेल्या अपघाताला या विद्युत रोषणाईने आळा बसण्यास मदत होणार आहे.”