पुणे : येथील कल्याणीनगर भागात रविवारी पहाटे आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडल्याची घटना घडली होती. सामान्य जनतेमध्ये या घटनेचे संतप्त पडसाद उमटले गेले आहे. या अपघात प्रकरणामध्ये आता आरोपीचे वडिल विशाल अग्रवाल यांना पुणे जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. असेच आरोपीचा फॉरेन्सीक रिपोर्ट देखील येणार आहे. अल्पवयीन आरोपीवर दाखल केलेल्या गुन्ह्यात कलम देखील वाढवण्यात आले आहे.
अपघातातील अप्लवयीन मुलावर मोटार वाहन कायद्यातील 185 च्या अंतर्गत नव्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर विशाल अग्रवाल याला दुपारी 2 वाजता कोर्टात हजर करण्यात येणार आहे. ससून रुग्णालयात त्यांचा काल मंगळवारी तपासणी करण्यात आली आहे. तर विशाल अग्रवाल यांचा आरोपी मुलगा याला बाल न्याय मंडळासमोर नेण्यात येणार आहे. अल्पवयीन प्रकरणात मोडते म्हणून आरोपीला जामीन मिळाला असे म्हटले जात होते. मात्र पुणे पोलिसांनी नव्याने अर्ज केला आहे. याप्रौढ गटामध्ये गणले जावे. दरम्यान आज यावर सुनावणी होणार आहे. सध्या कोर्टाच्या निर्णयावर सर्वांचे लक्ष लागले आहे.
185 कलमानुसार त्या अल्पवयीन मुलाने दारु पिवून गाडी चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पुणे पोलीसांनी हा गुन्हा दाखल करण्यासाठी दोन दिवस लावले. ज्या दिवशी अपघात झाल्या त्याच दिवशी हा गुन्हा दाखल करायला हवा होता असे नागरिकांमध्ये बोलले जात आहे.