पुणे : कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघाताप्रकरणी दररोज काहीना काही अपडेट समोर येत आहे. हे प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. विशाल अग्रवालचा मुलगा लवकर सुटण्यासाठी आता मृतांनाच दोषी ठरवणार असल्याची सरकारची तयारी सुरु असल्याचा एक खळबळजनक आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. देशमुख यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर यांसदर्भातील पोस्ट केली आहे.
पुणे हिट ॲन्ड रन प्रकरणामध्ये राजकीय दबावाखाली आरोपीचे रक्ताचे नमुने बदलून आरोपी दारू न पिल्याचा अहवाल तयार करण्याचे प्रयत्न झाले,हे उघड झाले आहे. आता माजी गृहमंत्री म्हणुन माझी माहिती अशी आहे की, मृतकांच्या Viscera Report मध्ये Alcohol +ve यावे याकरिता पूर्णपणे तयारी झाली आहे.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) June 13, 2024
अनिल देशमुख आपल्या पोस्टमध्ये म्हणालेत की, पुणे हिट अॅन्ड रन प्रकरणामध्ये राजकीय दबावाखाली आरोपीचे रक्ताचे नमुने बदलून आरोपी दारु न पिल्याचा अहवाल तयार करण्याचे प्रयत्न झाले, हे उघडकीस आले आहे. आता माजी गृहमंत्री म्हणून माझी माहिती अशी आहे की, मृतकांच्या Viscera Report मध्ये Alcohol + ve यावे करिता पूर्णपणे तयार झाली आहे.
जेणेकरुन या प्रकरणामध्ये मृत झालेले मोटारसायकल वरील तरुण तरुणी हे दारु पिऊन होते आणि त्यांच्यामुळेच हा अपघात झाला, असे न्यायालयात सिद्घ करता येईल. जेणेकरुन विशाल अग्रवालचा मुलगा लवकर सुटेल, अशा पद्धतीने प्रयत्न सुरु आहेत, असा गंभीर आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे.
दरम्यान कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघाताप्रकरणी झालेल्या अपघातात पोलीस कसून चौकशी करत आहेत.