Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune politics : ना युती, ना आघाडी… शरद पवारांची नवी खेळी? पुण्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 28 December 2025, 17:13
Pune politics

photo- social media

Pune politics : पुण्याच्या राजकारणात सध्या अक्षरशः सस्पेन्स ड्रामा सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे दोन्ही गट पुण्यात एकत्र निवडणूक लढवणार, अशा जोरदार चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. इतकंच नाही तर जागावाटपावर दोन्ही बाजूंच्या नेत्यांची बैठकही झाली होती. (Pune politics)

 

मात्र अजित पवार गटाकडून जो प्रस्ताव मांडण्यात आला, तो शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मान्य झाला नाही. त्यामुळेच शरद पवार गटाने थेट महाविकास आघाडीसोबत बोलणी सुरू केली, अशी माहिती समोर आली.

दोन दिवसांपूर्वी पुण्यातील एका हॉटेलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसच्या नेत्यांची गुप्त बैठक झाली होती. या बैठकीला शरद पवार गटाचे नेते उपस्थित होते, हे समजताच राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यामुळे “आता शरद पवार अजित पवारांसोबत जाणार नाहीत” असा अंदाज बांधला जात होता.

पण आजच्या घडामोडींनी सगळं चित्रच बदलून टाकलं आहे. कारण महाविकास आघाडीच्या पुढील बैठकीला शरद पवार गटाचे नेते अनुपस्थित राहिले. त्यामुळे पुन्हा एकदा प्रश्न उभा राहतोय – दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार का?

दरम्यान, आज बारामतीतही मोठ्या घडामोडी घडल्या. AI सेंटरच्या उद्घाटनानिमित्त उद्योगपती गौतम अदानी आज बारामती दौऱ्यावर होते. त्यांच्या स्वागतासाठी आमदार रोहित पवार विमानतळावर गेले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील त्यांचं स्वागत केलं.

इतकंच नाही तर शरद पवार यांच्या निवासस्थानी गौतम अदानी यांच्यासाठी पवार कुटुंबीयांसह स्नेहभोजनाचाही कार्यक्रम झाला. त्याआधी झालेल्या जाहीर कार्यक्रमात शरद पवार, अजित पवार, सुनेत्रा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे हे सगळे नेते एकाच मंचावर दिसले.

या सगळ्या घडामोडींमुळे राजकीय चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे. बारामतीत दिसलेली एकजूट आणि पुण्यातील बदलती समीकरणं पाहता, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय होणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

‘तुझ्या नवऱ्यानी माझ्यावर करणी केली’ पुण्यात जादूटोणा केल्याच्या वादातून महिलेला बेदम मारहाण; तलवार काढली अन्….

Thursday, 2 April 2026, 23:01
Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Next Post
Haveli News: Irrigation Department's helping hand in illegal plotting; Like in Kunjirwadi, half an acre of farmers' land at risk due to government's mismanagement?

Haveli News: अनधिकृत प्लॉटिंगला पाटबंधारे विभागाचा मदतीचा हात; कुंजीरवाडी येथील प्रकार, शासनाच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांची अर्धा एकर जमीन धोक्यात?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.