Pune News : पुणे : मॉडेलिंग करणारी एक तरुणी तिच्या ओळखीच्या एका तरुणासोबत नाशिक येथे मॉडेलिंगचे फोटोशूट करण्यासाठी गेली असता तरुण व तरुणी यांनी मॉडलिंगचे काढलेले कपल फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन, संबंधित तरुणीवर तरुणाने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर तिने सातत्याने आपल्याशी संबंध ठेवावेत, यासाठी अॅट्रोसिटीची केस करण्याची धमकी दिली. परंतु, या धमकीला न घाबरता तिने नकार दिला. तेव्हा तरुणाने ते फोटो वडिलांना पाठविले. धमकी देणाऱ्या या तरुणास पोलीसांनी अटक केली आहे.
चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
याप्रकरणी एका २१ वर्षाच्या तरुणीने चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. (Pune News) त्यावरून करण अण्णा पगारे (वय २५, रा. सामनगाव, नाशिक, सध्या सोमनाथनगर, वडगाव शेरी) या अटक केली आहे. हा प्रकार ऑगस्ट २०२२ पासून आतापर्यंत सुरु होता.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी व आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. तरुणी ही आरोपी सोबत नाशिक येथे मॉडलिंग फोटोशूट करण्यासाठी गेली होती. (Pune News) त्यावेळी कपल फोटो दोघांनी काढले. यावेळी आरोपीने संबंधित फोटो हे तरुणीचे नातेवाईक, आई-वडील यांना व सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन बळजबरीने तक्रारदार तरुणीवर बलात्कार केला.
त्यानंतर देखील तक्रारदार तरुणी सोबत हिने आपल्या सोबत शारीरिक संबंध ठेवावे याकरीता आरोपी मागणी करत होता. तसेच तरुणी व तिच्या कुटुंबीयांच्या विरुद्ध ॲट्रॉसिटीची केस करण्याची व कपल शूटचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेल करत होता. (Pune News) मात्र, तरुणीने आरोपी सोबत शरीर संबंध ठेवण्यास नकार दिला असता, तरुणीच्या वडिलांच्या मोबाईलवर आरोपीने कपल फोटो पाठवून तसेच समाजामध्ये बदनामी केल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत चंदनगर पोलिस ठाण्याच्या महिला पोलिस उपनिरीक्षक एस काळे पुढील तपास करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : वाहनचालकांसाठी महत्वाची बातमी : गर्डर उभारण्यासाठी चांदणी चौकातील वाहतूकीत बदल