Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Wonderful Wedding Story : ‘महेश’ च्या आयुष्याला ‘साक्षी’ ची साक्ष”…! दिव्यांग, मुकबधिर असणारे वर-वधूची लग्नगाठी मंगल परिणयात जोडले

युनूस तांबोळीby युनूस तांबोळी
Thursday, 29 June 2023, 18:02

Wonderful Wedding Story पुणे : घरची गरीबीची परिस्थीती, तुटपूंजी शेती त्यात दोन मुले दोन मुलगी असा जिंती ( ता. करमाळा ) येथील परिवार. वडील रमेश धेंडे यांनी मोठी मुलगी ज्योती हिचे लग्न करून जवळपास अठरा वर्षे झाली होती.  (Wonderful Wedding Story) तिच्या पाठिवर असणारा भाऊ महेश मुकबधिर, दिव्यांग असल्याने त्याच्या लग्नाची नेहमीच आई वडीलांना बरोबर बहिनालाही काळजी लागली होती. महेशच लग्न होणार की नाही या चिंतेत असणारे या कुटूंबाला नातेवाईक मित्रमंडळाची साथ होती. अखेर अंपग असणाऱ्या ‘साक्षी’ ला मुकबधीर ‘महेश’ भेटला. नजरानजर झाली त्यातच दोघांच्या साक्षीने आयुष्य़ाच्या लग्नगाठी मंगल परीणयात जोडल्या गेल्या. (Wonderful Wedding Story)

सोलापूर जिल्ह्यातील जिंती ( ता. करमाळा ) येथे तुटपूंजी शेती करणारे शेतकरी रमेश धेंडे आपल्या पत्नीसह शेती व्यवसाय करतात. त्यांना दोन मुले आणि दोन मुलगी असा त्यांचा परिवार आहे. मोठी मुलगी ज्योती हिचे अठरा वर्षा पुर्वी रुई (ता.इंदापूर) येथे कांबळे कुटूंबाशी विवाह झाला होता. त्यानंतर मुलगा महेश हा तिचा भाऊ जन्मजात मुकबधिर आहे. तसेच त्याला सुव्यवस्थित चालता येत नाही.

महेशने मुकेपणा व अंपगत्वावर मात करत त्याने आठवी पर्यंतचे शिक्षण घेतले होते. घरची गरिबीची परिस्थीती त्यामुळे महेशला पुढील शिक्षण घेता आले नाही. तरीही महेशने जिद्द व चिकाटी सोडली नाही. आयुष्य जगण्यासाठी काहितरी व्यवसाय करायचा. यासाठी त्याने व्यवसायांबाबत मार्गदर्शन मिळवले. जिंती (ता. करमाळा) येथे कपडे इस्त्री, झेरॉक्स व इलेक्ट्रॉनिक्स वस्तू दुरुस्त करण्याचे काम तो करू लागला.

 

कमी वेळेतच त्याच्या कष्टामुळे त्याच्या व्यवसायाला चांगली भरभराटी येऊ लागली. पण आयुष्यात साथीदाराची आवश्यकता असते. जीवनाच्या या गाडीला दुसरे चाक पत्नी म्हणून मिळावे. यासाठी तिच्या बहिनीची धडपड सुरू झाली. गरीब आई वडील मुलांच्या प्रपंचासाठी कष्ट उपसण्याची तयारी दाखवतात. पण योग्य जोडीदार मिळणे खूप जिकीरीचे झाले आहे. महेश चे लग्न जमावे यासाठी नातेवाईक मित्रमंडळी देखील कामाला लागले होते. त्यातून बहिनीला भावाच्या लग्नाची काळजी नेहमी सतवत असे.

” दिव्यांग मुकबधिरांचे मंगलमय जीवन” …!

एके दिवशी बहिण ज्योतीला नाव्ही (ता. इंदापूर) येथील दिव्यांग असणारी साक्षी घाडेगे हिची भेट घटली. मुकबधिर व दिव्यांग असणाऱ्या भाऊ महेश ची तीने ओळख करून दिले. नजरानजर झाली त्यातच दोघांच्या साक्षीने आयुष्य़ाच्या लग्नगाठी मंगल परीणयात जोडल्या गेल्या. कुटूंबातील प्रमुखांनी या ल्गनास मान्यता दिल्यावर रितीरिवाजाप्रमाणे हे अनोखे जोडपे बुधवारी (ता.२८) लग्नबंधनाच्या मंगल परिणयात जोडले गेले.

या वेळी टाकळीचे (ता.श्रीगोंदा) माजी सरपंच कोंडीबा रणसिंग, जिंतीचे ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय गायकवाड, पुणे प्राईम न्यूजचे उपसंपादक विशाल कदम, ह.भ.प.बलभीम पोटे, उद्योजक पटेल मुलाणी, अमोल रणसिंग, सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी मामा कदम, सामाजिक कार्यकर्ते संदीप जगताप, विनोद चव्हाण, किशोर धेंडे, प्रकाश धेंडे, सिद्धार्थ शिंदे, स्मिता जगताप, अनिता गायकवाड, काजल खरात, जयश्री साबळे, करुणा अब्दुले व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

युनूस तांबोळी

युनूस तांबोळी

गेल्या २२ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्राचा अनुभव व कार्यरत आहे. राज्याचा महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान २०१२ -२०१३ मध्ये व्दितीय क्रमांक, २०१४-२०१५ मध्ये जिल्हात प्रथम क्रमांक, कवठे येमाई भुषण पुरस्कार, आंबेगाव शिरूर मध्ये माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान, शिरूर तालुका पदवीधर संघ करपे पुरस्काराने सन्मानित, सातारा येथील अंध अपंग संस्थेकडून गौरव, मराठी भाषा निमित्त मनसे कडून गौरव, गेली २० वर्षात लहान मोठ्या संस्थाकडून गौरव व सन्मानचिन्ह २ वर्षे संवाद वाहिनी या वृत्तवाहिनी सोबत कार्य, दैनिक सकाळ च्या माध्यमातून गेली २० वर्षे कार्यरत, राजकारण, लेख, सदर, कवीता, या माध्यमातून लिखाण, फोटोग्राफी आणि व्हिडीयो यात विशेष प्रावीण्य , साम मराठी व इ सकाळच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे लिखाण सध्या पुणे प्राईम मधून पुन्हा लिखाणाची संधी मिळाल्याने कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

Pune News : 'ते' फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर बलात्कार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.