Pune News : पुणे : कोरेगाव पार्क येथील हॉटेल बाहेर लावलेल्या कारच्या काचेवर चिठ्ठी लावून १० लाखांची खंडणी मारणाऱ्या झोमॅटो डिलिव्हरी बॉयला गुन्हे शाखेच्या युनिट क्र. २ च्या पथकाने उंबरे ( ता. माळशिरस) गावातून अटक केली आहे.
गुन्हेशाखा युनिट २ ची कामगिरी
श्रीनाथ यलाप्पा शेडगे (वय २५, रा. मु. पो. उंबरे, अकलूज जवळ, ता. माळशिरस जि. सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामतीमधील व्यावसायिक कोरेगाव पार्क येथील हॉटेलमध्ये जेवण्यासाठी आले होते. (Pune News) जेवण करुन बाहेर आले असता त्यांच्या कारला एक पाकिट चिटकवलेले आढळून आले. त्यात तुम्ही 10 लाख रुपये दिले नाही तर तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला जीवे मारून टाकेल अशी धमकी दिली होती.
दरम्यान, आरोपी श्रीनाथ शेडगे हा पुण्यात झोमॅटो डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. आरोपीने फोन करुन त्यांना जेवणाच्या डब्यात पैसे टाकून ते कोरेगाव पार्क येथे आणून देण्याची धमकी दिली होती. (Pune News) या गुन्ह्याचा समांतर तपास युनिट २ चे पथक करत होते.
पथकातील पोलीस अंमलदार गजानन सोनुने व पुष्पेद्र चव्हाण यांना धमकी देणारा आरोपी हा अकलुज येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने अकलुज पोलिसांच्या मदतीने शेडगे याला ताब्यात घेतले. आरोपीने पोलिसांना सदर गुन्ह्याची कबुली दिली आहे. (Pune News) तसेच सदर गुन्हा हा कर्जबाजारी झाला असल्याने केला असल्याचे पोलिसांना सांगितले आहे. पुढील तपासासाठी गुन्हे शाखेने आरोपीला कोरेगाव पार्क पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
ही कामगिरी गुन्हे शाखेच्या युनिट क्र. २चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन कांबळे, पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी, अमोल सरडे , गजानन सोनुने , पुष्पेंद्र चव्हाण, उत्तम तारू, साधना ताम्हाणे, निखिल जाधव, मोसिन शेख, नागनाथ राख यांच्या पथकाने केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुण्यात पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळीबार; सराईत गुन्हेगारासह साथीदारांना पोलिसांचा दणका!
Pune News : ‘माझ्याकडे बॉम्ब आहे’ पुणे विमानतळावरील महिलेचा दावा; सुरक्षा यंत्रणेचे धाबे दणाणले!