Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Uruli Kanchan News : लोणी काळभोर : लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांचा उच्छाद सुरूच; उरुळी कांचन येथून फॉर्च्युनरच चोरली; ठिकठिकाणी सीसीटीव्ही असूनही कारवाई मात्र शून्यच !

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 5 August 2023, 18:10

Uruli Kanchan News  उरुळी कांचन : लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी व घरफोड्यांचे सत्र सुरूच आहेत. गेल्या दोन दिवसांपूर्वी सोरतापवाडी व कुंजीरवाडी येथील तीन दुकाने चोरट्यांनी फोडल्याची घटना ताजी असतानाच आता दोन चोरट्यांनी उरुळी कांचन (ता. हवेली) शहरातून फॉर्च्युनर कार चोरल्याची धक्कादायक घटना आज शनिवारी (ता.५) सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. (Uruli Kanchan News)

याप्रकरणी सागर पोपट कांचन (रा.उरुळी कांचन, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर कांचन यांनी नेहमीप्रमाणे त्यांची फॉर्च्युनर गाडी (क्र. MH १२ PH ०१०५) शुक्रवारी (ता.४) रात्री घराच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती. दरम्यान, सागर कांचन यांना सकाळी उठल्यावर त्यांच्या पार्किंगमधील फॉर्च्युनर गाडी आढळून आली नाही. त्यानंतर सागर कांचन यांनी सीसीटीव्ही तपासले असता, शुक्रवारी मध्यरात्री २ च्या सुमारास दोन अज्ञात चोरट्यांनी फॉर्च्युनर गाडीचे लॉक उघडून गाडी घेऊन पळून गेले. (Uruli Kanchan News)

याप्रकरणी सागर कांचन यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दोन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किरण धायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार रमेश गायकवाड करीत आहेत. (Uruli Kanchan News)

 

View this post on Instagram

A post shared by Pune Prime News (@puneprimenews)

लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीचे सत्र थांबता थांबेना !

कुंजीरवाडी (ता. हवेली) येथे मेडिकल व हार्डवेअर दुकान फोडून चोरट्यांनी मंगळवारी (ता. १) रात्री रोख रक्कम चोरून नेली होती. ही घटना ताजी असतानाच, चोरट्यांनी पुणे-सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कलागोविंद कार्यालयाशेजारी असलेले एक स्नॅक्स सेंटर फोडून रोख रकमेसह साहित्य चोरून नेल्याची घटना बुधवारी (ता. २) मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. त्यामुळे लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीचे सत्र काही केल्या थांबता थांबेना असा प्रश्न निर्माण झाला आहे. (Uruli Kanchan News)

ठिकठिकाणी सीसीटीव्ही असूनही कारवाई नाहीच

या परिसरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. सीसीटीव्हीत चोरटे कैद होत आहेत. परंतु, पोलिसांना चोरटे मिळत नाहीत. म्हणून पोलिसांच्याच कार्यक्षमतेवर सवाल उपस्थित केला जात आहे. (Uruli Kanchan News)

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

Pune News : कारच्या काचेवर चिठ्ठी लावून १० लाखांची खंडणी मागणार्‍या झोमॅटो डिलिव्हरी बॉयला अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.