Pune News : पुणे : पुणे जिल्ह्यातील पहिले खासगी हिल स्टेशन असलेल्या लवासा या बहुचर्चित प्रकल्पावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभारला जाणार आहे. पुणेकरांसाठी ही अनोखी भेट असणार आहे. हा जगातील सर्वात उंच पुतळा असेल आणि याची उंची जवळवास १९०-२०० मीटर असेल, अशी माहिती मिळत आहे.
१९०-२०० मीटर उंची असेल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळारी पुणे दौरा केला. पुण्यात पीएम मोदी यांचा लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मान करण्यात आला. त्यानंतर त्यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातीलच पूर्ण झालेल्या दोन मार्गिकांचे लोकार्पण करण्यात आले. तसेच पंतप्रधान आवास योजनेतील घरांचे लोकार्पणही पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आले. (Pune News) प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने बांधलेली १२८० घरे तसेच पुणे महापालिकेने बांधलेली २६५० घरांचे लोकार्पण मोदींनी केले. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून बांधण्यात येणाऱ्या ६४०० हून अधिक घरांची पायाभरणीही मोदींच्या हस्ते झाली. आता पुणेकरांना आणखी एक भेट मिळणार आहे.
मुंबईतील डार्विन ग्रुपचा लवासा खरेदी करण्याच्या प्रस्ताव राष्ट्रीय कंपनी कायदा प्राधिकरणाने (एनसीएलटी) मान्य केला. हा प्रकल्प १,८१४ कोटी रुपयांमध्ये ही डार्विन ग्रुपने खरेदी केला. या ठिकाणी डार्विन ग्रुप नरेंद्र मोदी यांचा पुतळा उभारणार आहे. (Pune News) पुतळा उद्घाटनाच्या कार्यक्रमात जर्मनी, इस्त्रायल, फ्रांस, संयुक्त अरब अमीरात आणि अमेरिकेचे राजदूतांचा सहभाग असेल, अशी माहितीही मिळत आहे.
एकूण १२ हजार ५०० एकर जमिनीवर हा प्रकल्प उभारला जात आहे. दिवाळखोरीत गेल्यामुळे या प्रकल्पाचे काम रखडले होते. (Pune News) परंतु आता डार्विन कंपनी हा प्रकल्प विकत घेतल्यामुळे त्यांचे काम सुरु होणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पावसाळ्यात अनावश्यक रस्ते खोदाई केल्यास तर खबरदार..! महापालिका कारवाई करणार
Pune News : लोहगाव परिसरातून १ कोटींचे अफिम जप्त करून एका तस्करास अटक