Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor News : कुंजीरवाडी, सोरतापवाडीत तीन दुकाने फोडली ; चोरटे सीसीटीव्हीत कैद ; लोणी काळभोर पोलिसांची गस्त नावालाच!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 3 August 2023, 12:23

Loni Kalbhor News  लोणी काळभोर : कुंजीरवाडी (ता. हवेली) येथे मेडिकल व हार्डवेअर दुकान फोडून चोरट्यांनी मंगळवारी (ता. १) रात्री रोख रक्कम चोरून नेली होती. ही घटना ताजी असतानाच, चोरट्यांनी पुणे-सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कलागोविंद कार्यालयाशेजारी असलेले एक स्नॅक्स सेंटर फोडून रोख रकमेसह साहित्य चोरून नेल्याची घटना बुधवारी (ता. २) मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. चोरी करून पळून जाताना चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. (Loni Kalbhor News)

दरम्यान, सलग दुसऱ्या दिवशी चोरी झाल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. लोणी काळभोर पोलिसांची गस्त फक्त नावालाच असते का, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. (Loni Kalbhor News)

मिळालेल्या माहितीनुसार, महेश मुकिंदा चौधरी (वय २६, रा. वडाचीवाडी, नायगाव-पेठ, ता. हवेली) यांचे सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कलागोविंद कार्यालयाशेजारी एक स्नॅक्स सेंटर आहे. चौधरी यांनी नेहमीप्रमाणे बुधवारी (ता. २) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास स्नॅक्स सेंटर बंद केले आणि गुरुवारी (ता. ३) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास दुकान उघडण्यासाठी आले असता, त्यांना दुकानाचे शटर उचकटल्याचे निदर्शनास आले. (Loni Kalbhor News)

 

त्यानंतर महेश चौधरी यांनी स्नॅक्स सेंटरमध्ये जाऊन पाहणी केली असता, चोरट्यांनी गल्ल्यातील १० हजार रुपयांच्या रोकडसह दुकातानील कोल्ड्रिंक्स व इतर सामान चोरून नेल्याचे निदर्शनास आले आहे. महेश चौधरी यांनी सीसीटीव्हीमध्ये पहिले असता, त्यांना चार चोरटे चोरी करून दुचाकीवरून पळून जाताना निदर्शनास आले. याबाबत अद्याप लोणी काळभोर पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार देण्यात आलेली नाही. (Loni Kalbhor News)

दरम्यान, गेल्या आठ दिवासांपूर्वी कुंजीरवाडी व थेऊर फाटा परिसरात तीन ठिकाणी घरफोडी झाल्या होत्या. त्यानंतर कुंजीरवाडीतच दोन दिवसांपूर्वी मेडिकल व हार्डवेअर दुकान फोडले. या चोरीत चोरट्यांना दुकानातील फक्त चिल्लर हाती लागली होती. त्यानंतर चोरट्यांनी सोरतापवाडी स्नॅक्स सेंटर फोडून मुद्देमाल लंपास केला आहे. (Loni Kalbhor News)

लोणी काळभोर पोलिसांचे गस्त नावालाच

लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांचा धुमाकूळ मागील काही दिवसांपासून सुरू आहे. दुचाकी चोरीला जाण्याच्या घटना वाढल्या आहेत. सदनिकांचे कडी कोयंडे तोडून ऐवज चोरून नेण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे पोलिसांनी गस्त वाढवून गुन्हे रोखले पाहिजेत. कायदा व सुव्यवस्था राखली पाहिजे. मात्र, याच परिसरात सारख्या चोऱ्या होत असल्याने लोणी काळभोर पोलिसांची गस्त फक्त नावालाच असते का, असा सवाल नागरिकांनी केला आहे. (Loni Kalbhor News)

 

 

 

 

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

Sangola News : शतपावलीसाठी घराबाहेर पडले अन् घडले भयानक; सांगोल्यात पोलीस उपनिरीक्षकाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.