Pune News : पुणे : पुण्यात गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये वाढ होत असल्याचे सातत्याने निदर्शनास येत आहे. आज देखील असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीएमपीएमएल डेपोमध्ये कंडक्टर म्हणून कार्यरत असलेल्या एका ३० वर्षीय महिलेचा विनयभंग झाला आहे. या प्रकरणी संबंधित आरोपी विरोधात पीडित महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली.
बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला पीएमपीएमएल डेपोमध्ये कंडक्टर आहे. या महिलेच्या ओळखीतील एका सहकाऱ्याने तिचा पाठलाग करून, मनास लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारे हातवारे करत तिचा विनयभंग केला. (Pune News ) याप्रकरणी पोलिसांनी सुनील धोंडीभाऊ भालेकर (वय ४३, रा. कानहुर पठार, ता. पारनेर, जि. अहमदनगर) याला अटक केली आहे. आरोपीवर बंडगार्डन पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिलेच्या तक्रारीनुसार, संबंधित महिला ही पुण्यातील पीएमपीएमएल डेपोमध्ये कंडक्टर म्हणून कार्यरत आहे. आरोपी सुनील भालेकर हा तिच्या कामाच्या ठिकाणी ओळख झालेला सहकारी आहे. तो मागील दोन महिन्यांपासून महिलेचा पाठलाग करत होता. हा प्रकार ५ जून २०२३ ते ४ ऑगस्ट २०२३ या दरम्यान घडलेला आहे.
लज्जा उत्पन्न होईल असे हातवारे करून, शिट्टी मारून तो तिला त्रास देत होता. (Pune News)कामावर असताना तू माझ्याकडे दुर्लक्ष करत आहेस, मला तू खूप आवडतेस, माझ्या प्रेमाचा स्वीकार कर, असे बोलून तिचा विनयभंग करून शिवीगाळ व धमकी दिल्याने आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक एम. मधाळे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.