Pune News : पुणे : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सत्ताधारी भाजप-शिवसेनेशी हातमिळवणी करून वेगळी चूल मांडल्यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट तयार झाले असून, दोन्ही गट राष्ट्रवादी आपलीच असल्याचा दावा निवडणूक आयोगाकडे करत आहेत. या बंडाचा पवार कुटुंबीयांवर परिणाम होणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पवारांची दिवाळी कालही एकत्रित होती, आजही एकत्रित आहे आणि उद्याही एकत्रित राहील…
प्रत्येक दिवाळीत पवार कुटूंब एकत्र येतं. आता दिवाळी तोंडावर आलेली असतानाच, हे सत्तानाट्य रंगलं आहे. या पार्श्वभूमीवर पवार कुटुंब या दिवाळीत एकत्र येणार का? असा सवाल सुप्रिया सुळे यांना विचारला असता, त्यांनी दिलेलं उत्तर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. राजकीय मतभेद जरूर झालेले आहेत. पण, पवारांची दिवाळी कालही एकत्रित होती, आजही एकत्रित आहे आणि उद्याही एकत्रित राहील… अशी ठाम भूमिक सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केली आहे.
बारामती शहरातील माळावरच्या देवीचे दर्शन सुळे यांनी घेतले. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या की, शारदाबाई पवार आणि प्रतिभा पवार या दोघीही नवरात्र उत्सव साजरा करतात. माझ्या आईची आणि आजीची आस्था असल्यामुळे मी दर्शनाला आले आहे. गोविंद बाग हे महाराष्ट्रातील मायबाप जनतेच घर आहे. ३६५ दिवस हे घर जनतेसाठी कायम उघडे असते. त्यामुळे तुम्ही कधीही गोविंद बागेत येऊ शकता. (Pune News) आम्ही राजकारणी मंडळी नेते म्हणून सर्व गोष्टी करत नाही. काहीवेळा कौटुंबिक नाती असतात. त्यामुळे पुन्हा एकदा सांगेन, पवारांची दिवाळी कालही एकत्रित होती, आजही एकत्रित आहे आणि उद्याही एकत्रित राहील. राजकीय मतभेद आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या यामध्ये फरक असतो, हे लक्षात घ्या. मी भारतीय संस्कृती मानणारी आहे. जेव्हा राजकीय लढाई असेल तर ती पूर्ण ताकदीने लढली जाईल. जेव्हा कुटुंबीयांच्या जबाबदाऱ्या असतील तर जबाबदारीने पार पाडू, असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, बारामती येथील मनोज जरांगे यांच्या सभेबाबत पत्रकारांनी छेडले असता, सुप्रिया सुळे म्हणाल्या की, जरांगे यांचे बारामतीत स्वागत आहे. (Pune News) लोकशाहीत कोणी कुठेही सभा घेऊ शकतो. दिल्लीच्या सत्तेतील हुकूमशाही लोकांना वागणुकीतून दिसतच आहे. पण आम्ही लोकशाहीचे पुरस्कर्ते आहोत. जरांगे यांनी कुठे सभा घ्यावी हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे.
ड्रग्ज विरोधात लढा देणाऱ्या सुषमा अंधारे यांच्या पाठिशी ताकतीने उभे राहणार आहोत, असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. हा पक्षाचा विषय नाही. (Pune News) हा महिलेचा आणि ड्रग्सचा विषय आहे. ड्रग्सला कोणी सहाय्य करत असेल, तर आम्ही सत्याचा बाजूने उभे राहू. ट्रिपल इंजिन सरकारची दडपशाही खपवून घेणार नाही.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : भाजप नेत्याची बिल्डरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण; सीसीटीव्ही फुटेज व्हायरल…
Pune News : नॅशनल कराटे तायक्वांदो स्पर्धेत डोर्लेवाडीतील शिवतेज जाधवला सुवर्ण..
Pune News : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य व आयुष्मान भव योजनेचे सुप्रिया सुळे यांच्या हस्ते उद्घाटन