Pune News : पुणे : पुणे शहरात गेल्या काही दिवसांत अनेक घटना घडल्या, ज्यामुळे पुण्यात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असल्याचे निदर्शनास आले. पुण्याची ओळख बदलत असल्याचे या घटनांवरून स्पष्ट होत आहे. १८ जून रोजी दर्शना पवार हिच्या हत्येचे प्रकरण उघड झाले, त्यानंतर काही दिवसांतच सदाशिव पेठेत भरदिवसा एका तरुणीवर कोयता हल्ला झाला. हल्लेखोर शंतनू लक्ष्मण जाधव याला अटक करण्यात आली होती. आता त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलीस आयुक्तांनी कर्तव्यात कसूर केल्यामुळे पोलीस निरीक्षकासह काही कर्मचाऱ्यांवर देखील निलंबनाची कारवाई केली.
न्यायालयीन कोठडी मिळाल्यामुळे येरवडा कारागृहात रवानगी
शंतनू जाधव हा माथेपिरू तरुण कोयता हातात घेऊन तरुणीवर हल्ला करण्यासाठी धावत होता. तर तरुणी जीव वाचवण्यासाठी सैरावरा पळत होती. (Pune News ) भर रस्त्यात हा थरार सुरू असताना अनेकांनी बघ्याची भूमिका घेतली. मात्र, मुलीच्या ओरडण्याचा आवाज येताच लेशपाल जवळगे (रा. आढेगाव, ता. माढा, जि. सोलापूर) आणि त्याचा मित्र हर्षल पाटील याने जीवाची पर्वा न करता कोयता हातात घेऊन पीडितेच्या दिशेने धावणाऱ्या तरुणाला मागून दोन्ही हातांनी पकडलं. तिच्यावर वार होण्याआधीच लेशपालने तो वार उलटवला, त्यामुळे या पीडितेचा जीव वाचला.
शंतनू जाधव आणि ती तरुणी हे दोघे एकाच कॉलेजमध्ये होते. शंतनूचे तरुणीवर प्रेम होते. त्याने आपल्या प्रेमाची कबुली तरुणीला दिली. मात्र, तरुणीने त्याचा प्रस्ताव फेटाळला आणि शंतनूशी संवाद साधणे बंद केले. यामुळे संतप्त झालेल्या शंतनूने तिला ठार मारण्याची धमकी दिली. (Pune News ) तिला मारहाण करण्याचा प्रयत्न देखील केला. या प्रकाराची तरुणीने त्याच्या घरच्यांना कल्पना दिली. मात्र, दखल घेण्यात आली नाही. संतप्त तरुणाने अखेर तिला सदाशिव पेठ परिसरात गाठून हा हल्ला केला होता.
दरम्यान, आरोपीची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर शनिवारी त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. त्यामुळे त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली. (Pune News ) पोलीस चौकशीत त्याने हल्ला केल्याची कबुली दिली होती. तसेच त्याच्याजवळ असणारा कोयताही जप्त करण्यात आला होता.
आपला जीव धोक्यात घालून तरुणीचा जीव वाचवणाऱ्या लेशपाल जवळगे आणि हर्षल पाटील या दोन्ही तरुणांचे सर्वत्र कौतूक होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदोघांनाही पाच लाखांचे बक्षीस दिले. (Pune News ) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोघांचे फोनद्वारे कौतूक केले. शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्यासह जितेंद्र आव्हाड यांनी देखील या तरुणांचे मनापासून कौतूक केले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : शाळेतून मुलीला घरी आणण्यासाठी निघालेल्या आईचा डंपरखाली सापडून मृत्यू