Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : तरुणीवर कोयत्याने हल्ला करणाऱ्या माथेफ़िरूची अखेर येरवडा कारागृहात रवानगी!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 2 July 2023, 16:26

Pune News  : पुणे : पुणे शहरात गेल्या काही दिवसांत अनेक घटना घडल्या, ज्यामुळे पुण्यात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असल्याचे निदर्शनास आले. पुण्याची ओळख बदलत असल्याचे या घटनांवरून स्पष्ट होत आहे. १८ जून रोजी दर्शना पवार हिच्या हत्येचे प्रकरण उघड झाले, त्यानंतर काही दिवसांतच सदाशिव पेठेत भरदिवसा एका तरुणीवर कोयता हल्ला झाला. हल्लेखोर शंतनू लक्ष्मण जाधव याला अटक करण्यात आली होती. आता त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलीस आयुक्तांनी कर्तव्यात कसूर केल्यामुळे पोलीस निरीक्षकासह काही कर्मचाऱ्यांवर देखील निलंबनाची कारवाई केली.

न्यायालयीन कोठडी मिळाल्यामुळे येरवडा कारागृहात रवानगी

शंतनू जाधव हा माथेपिरू तरुण कोयता हातात घेऊन तरुणीवर हल्ला करण्यासाठी धावत होता. तर तरुणी जीव वाचवण्यासाठी सैरावरा पळत होती. (Pune News ) भर रस्त्यात हा थरार सुरू असताना अनेकांनी बघ्याची भूमिका घेतली. मात्र, मुलीच्या ओरडण्याचा आवाज येताच लेशपाल जवळगे (रा. आढेगाव, ता. माढा, जि. सोलापूर) आणि त्याचा मित्र हर्षल पाटील याने जीवाची पर्वा न करता कोयता हातात घेऊन पीडितेच्या दिशेने धावणाऱ्या तरुणाला मागून दोन्ही हातांनी पकडलं. तिच्यावर वार होण्याआधीच लेशपालने तो वार उलटवला, त्यामुळे या पीडितेचा जीव वाचला.

शंतनू जाधव आणि ती तरुणी हे दोघे एकाच कॉलेजमध्ये होते. शंतनूचे तरुणीवर प्रेम होते. त्याने आपल्या प्रेमाची कबुली तरुणीला दिली. मात्र, तरुणीने त्याचा प्रस्ताव फेटाळला आणि शंतनूशी संवाद साधणे बंद केले. यामुळे संतप्त झालेल्या शंतनूने तिला ठार मारण्याची धमकी दिली. (Pune News ) तिला मारहाण करण्याचा प्रयत्न देखील केला. या प्रकाराची तरुणीने त्याच्या घरच्यांना कल्पना दिली. मात्र, दखल घेण्यात आली नाही. संतप्त तरुणाने अखेर तिला सदाशिव पेठ परिसरात गाठून हा हल्ला केला होता.
दरम्यान, आरोपीची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर शनिवारी त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. त्यामुळे त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली. (Pune News ) पोलीस चौकशीत त्याने हल्ला केल्याची कबुली दिली होती. तसेच त्याच्याजवळ असणारा कोयताही जप्त करण्यात आला होता.

 

आपला जीव धोक्यात घालून तरुणीचा जीव वाचवणाऱ्या लेशपाल जवळगे आणि हर्षल पाटील या दोन्ही तरुणांचे सर्वत्र कौतूक होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदोघांनाही पाच लाखांचे बक्षीस दिले. (Pune News ) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोघांचे फोनद्वारे कौतूक केले. शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्यासह जितेंद्र आव्हाड यांनी देखील या तरुणांचे मनापासून कौतूक केले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : पुण्यातील एका नामांकित कॉलेजमध्ये तरुणाने थेट कोयता काढून दहशत माजवली ; मग पोलिसांनी त्याच परिसरात तरुणाची काढली धिंड

Pune News : शाळेतून मुलीला घरी आणण्यासाठी निघालेल्या आईचा डंपरखाली सापडून मृत्यू

Pune News : काय सांगता..! कोयता दुसऱ्याला विकण्याच्या कारणावरून पती-पत्नीने केले एकमेकांवर वार, पुण्यातील घटना..

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

Tejaswini Bhilare : हिलरेंज एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका तेजस्विनी भिलारे दिल्ली संस्थेतील "मोस्ट अँडमायर प्रिन्सिपल अवार्डने सन्मानित"..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.