Pune News : पुणे : इस्रोच्या चांद्रयान ३ चे चंद्रावर यशस्वी लँडिंग झाले. या यशामुळे भारतातील १४० कोटी जनतेची मान अभिमानाने वर गेली आहे. ऊर आनंदाने भरून आला आणि प्रत्येकजण इस्रोच्या शास्त्रज्ञांना कडक सॅल्युट करत एवढचं म्हणतोय… गर्व आहे मला, मी भारतीय असल्याचा! या ऐतिहासिक यशानंतर संपूर्ण देशभरातील शालेय विद्यार्थ्यांची अवकाश विज्ञानाबद्दलची रुची वाढल्याचे चित्र आहे. या घटनेने प्रेरीत झालेले हजारो विद्यार्थी भविष्यात शास्त्रज्ञ होण्याची इच्छा व्यक्त करत आहेत.
इस्त्रोची कामगिरी कौतुकास्पद…
चंद्रयान ३ लॅंडिंगचा क्षण माझ्यासाठी अत्यंत रोमांचक होता. त्यात रामन सायन्स केंद्रातील वातावरणाने मी फार भारवून गेलो होतो. हा क्षण कोणत्याही उत्सवापेक्षा कमी नव्हता. इस्त्रोने केलेली कामगिरी खरोखरच कौतुकास्पद होती. भविष्यात अशा मोहिमेचा भाग व्हावे, अशी माझी इच्छा आहे. (Pune News) भारताच्या या ऐतिहासिक मिशनचे केवळ शहरातच नाही तर ग्रामीण भागातही जोरदार सेलिब्रेशन झाले. यामुळे या मोहिमेचा मला अभिमान आहे.
आराध्य खाडे, विद्यार्थी, चैतन्य विद्यालय, ओतूर (आठवी)
हा क्षण आनंदाचा…
चंद्रयान -३ मिशन यशस्वी झाल्यास मला चंद्रावर राहण्यास आवडेल; परंतु माझी सर्वांनाच विनंती असेल की, मानवी हस्तक्षेप आणि प्रदूषणाने पृथ्वीची जी हानी झाली, ती पुन्हा चंद्रावर होऊ नये. चंद्रयानाची यशस्वी झेप हा माझ्यासह तमाम भारतीयांसाठी आनंदाचा दिवस आहे. (Pune News) आम्ही म्हणू की, चल मी तुला चंद्रावर घेऊन जातो.
वैभव शिंदे, विद्यार्थी, विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कान्हूर मेसाई ( बारावी विज्ञान)
अभिमानाची गोष्ट
माझ्यासह संपूर्ण देशासाठी कालचा दिवस अविस्मरणीय होता. चंद्राच्या दक्षिण भागात नेमके काय आहे, हे आता या मोहिमेअंतर्गत समोर येईल. इस्त्रोने भविष्यात आणखी नवनवीन उपक्रम राबवून भारतीयांचे नाव उंचवावे, अशी मला आशा आणि अपेक्षा आहे.
प्रतिक गाजरे, जय मल्हार हायस्कूल, जांबूत (दहावी)
शास्त्रज्ञ होण्यासाठी प्रोत्साहन
भारताचे मिशन चंद्रयान -३ यशस्वी व्हावे यासाठी नागरिकांनी प्रार्थना केली. मिशन यशस्वी झाल्यानंतर इस्त्रोच्या शास्त्रज्ञांची प्रार्थना फळाला आल्याची भावना निर्माण झाली. चंद्रयान -३ दक्षिण धु्व्रावर सुरक्षितरित्या पोहचले, हे पाहून डोळ्यांत आनंदाश्रू तरळले होते.(Pune News) भारताचे हे यश जगात मानाचे स्थान मिळवून देणारे आहे. भविष्यात अशा क्षेत्रात कामगिरी करून शास्त्रज्ञ होण्यासाठी प्रोत्साहन मिळाले आहे.
दिव्या इचके, न्यू इंग्लिश स्कूल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कवठे येमाई (दहावी)
Pune News : हडपसर येथे ट्रकचे स्टेअरिंग तुटून, दुभाजकाला धडक; केबिनचा चक्काचूर
Pune News : पुणे रेल्वे स्थानकात आता शिशू स्तनपान कक्ष!
Pune News : ‘पीएमपी’ होतेय ‘स्मार्ट’; घरबसल्या कळणार बसचे लोकेशन