Pune News : पुणे : माहिती तंत्रज्ञानाच्या प्रसाराबरोबरच सायबर गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ होताना आढळत आहे. अशा गुन्ह्यांत मोठ्या संख्येने महिला बळी पडतात, असे निरीक्षण आहे. पुण्यात नुकतीच अशीच एक घटना उघडकीस आली आहे. ऑनलाइन टास्कच्या नावाने शिकवणी चालक महिलेची पाच लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सिंहगड रस्ता पोलिसात गुन्हा दाखल
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला सिंहगड रस्त्यावरील धायरी फाटा परिसरात वास्तव्याला आहे. त्या शिकवणी चालक आहेत. (Pune News) सायबर चोरट्यांनी महिलेच्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठविला होता. घरातून काम करण्याची संधी उपलब्ध असल्याचे आमिष दाखवून चोरट्यांनी महिलेची वारंवार फसवणूक केली.
संबंधित महिलेला विश्वासात घेण्यासाठी सुरुवातीला चोरट्यांनी महिलेला समाजमाध्यमातील मजकूर तसेच ध्वनिचित्रफितीला पसंती मिळवून देण्याचे आमिष दाखवले. (Pune News) विश्वास संपादन करण्यासाठी तिला काही पैसे देखील दिले. त्यानंतर चोरट्यांनी महिलेला जाळ्यात ओढण्यास सुरवात केली.
महिलेला बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगण्यात आले. असे करून महिलेकडून चोरट्यांनी वेळोवेळी पाच लाख रुपये उकळले. मात्र, त्याचा कोणताही परतावा महिलेला देण्यात आला नाही. (Pune News) फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयंत राजूरकर या घटनेचा अधिस तपास करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : संतापजनक! जन्मदात्या आईच्या डोक्यात दगड घालून केले गंभीर जखमी; मुलावर गुन्हा दाखल!
Pune News : पुण्यातील पद्मावती बस स्थानकाजवळ बर्निंग कारचा थरार
Pune News : हर घर तिरंगा! भारतीय क्रिकेटर केदार जाधव यांना पुणे ग्रामीण डाक विभागाने दिला तिरंगा