Pune news : पुणे : पावसाने दडी मारल्याने शिरूर, पुरंदरसह जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये पाणीटंचाई सुरु झाली आहे. यामुळे प्रशासनाने नागरिकांची तहान भागविण्यासाठी पुन्हा ४० टँकरने पाणी देणे सुरु केले आहे.
४० टँकरने पाणीपुरवठा सुरु
जिल्ह्यात मार्चपासून आंबेगाव, खेड, जुन्नर आणि भोर तालुक्यात टँकर सुरू झाले होते. आता त्यात आणखी दोन पुरंदर आणि शिरूर तालुक्यांची भर पडली आहे. शिरूर मध्ये १३ टँकर व पुरंदर मध्ये ७ टँकर सुरू करण्यात आले आहेत. (Pune news) त्यामुळे सध्या जिल्ह्यात ५ तालुक्यांमध्ये ४० टँकरने ३६ गावांसह २७१ वाड्या वस्त्यांमधील ९८ हजार २२४ लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
जिल्ह्यात मार्चनंतर टँकर सुरू झाले होते. त्यानंतर ही टँकरची संख्या ६० वर पोहोचली. मात्र, जुलैत चांगला पाऊस झाल्याने ही संख्या घटून २६ पर्यंत खाली आली. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत स्थिती कायम होती. मात्र, त्यानंतर दोन आठवड्यांत पावसाचा जोर ओसरल्याने पुन्हा पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली. त्यामुळे पुन्हा टँकरने पाणीपुरवठा सुरु केला आहे.
आंबेगाव तालुक्यात सहा टँकरने सात गावांसह ४४ वाड्या वस्त्या, तर जुन्नर तालुक्यात सहा टँकरने पाच गावांसह ५८ वाड्या वस्त्या, (Pune news) खेडमधील ११ गावांसह ६२ वाड्या वस्त्यांमध्ये आठ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. एकूण ४० टँकरपैकी ३७ खासगी टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाणीपुरवठ्यासाठी आतापर्यंत २३ खासगी विहिरी ताब्यात घेण्यात आल्या असून टँकरच्या १४९ फेऱ्या झाल्या आहेत.
दरम्यान, टँकरने पाणी सुरू केलेल्या तालुक्यांपैकी भोर तालुक्यात पावसामुळे पाण्याची टंचाई स्थिती सुधारली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी टँकर बंद झाले आहेत.
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांमध्ये पाणीपुरवठा सुरु
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांमध्ये आज मितीला १३६ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सोलापूर जिल्ह्यात नऊ गावांसह ७४ वाड्या वस्त्यांना नऊ टँकर सुरू आहेत. (Pune news) सातारा जिल्ह्यात ६१ टँकरने ५६ गावांसह ३४३ वाड्या वस्त्यांना तर सांगली जिल्ह्यात २७ टँकरने २३ गावांसह १६९ वाड्यावस्त्यांना पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र, कोल्हापूर येथील राधानगरी धरण भरल्याने तेथील पाण्याची चिंता सध्या मिटली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुण्यात रुग्ण हक्क संरक्षण कायद्यासाठी ”रास्ता रोको” आंदोलन!
Pune News : पंतप्रधान पीक विमा योजनेत महाराष्ट्र राज्य दुसऱ्या क्रमांकावर…..
Pune News : धावता धावता चक्कर आल्याने आयटी कंपनीत काम करणाऱ्या तरुणाचा मृत्यू