Viral Video : पुणे : पुण्यात पेशवाई आहे. इथे प्रत्येक गोष्ट नावाजली जाते. संस्कृती असो की भाषा, शिक्षण असो की येथील ऐतिहासिक वास्तू , सर्व काही जगभरात लोकप्रिय आहे. सोशल मीडियावर पुण्यातील विद्यार्थ्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात दरवर्षी हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी येथे येतात. गाव खेड्यातील येणारी मुलं येथे शिक्षण घेऊन स्वत:चे उज्वल भविष्य घडवतात. सध्या असाच एक व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये दोन कॉलेजची मुलं पाठीवर बॅग घेऊन वारकरी पोशाखात दिसत आहेत.
पुणे हे देशातील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. तरुणांचा हा वारकरी पोशाख पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या व्हायरल व्हिडीओमध्ये दोन तरुणांनी धोतर नेसले आहे. डोक्यावर टोपी पांढरी, अंगावरपांढरा सदरा घातला आहे. पााठीवर पाठीवर बॅग आहे. तरुणांचा हा पारंपारिक लूक पाहून रस्त्यावरील अनेक जण त्यांच्याकडे पाहताना दिसत आहे. काही तरुणी या दोन तरुणांना पाहून हसताना दिसत आहे. तरुणांचा हा वारकरी पोशाख पाहून काही लोकं थक्क झालेत. तर काहींची त्यांच्यावरुन नजर सुद्धा हटत नाही. तरुणांनी गॉगल सुद्धा घातला आहे.
वारकरी संस्कृती ही महाराष्ट्राचा अविभाज्य भाग आहे. नेटकऱ्यांनी त्यांचे खूप कौतुक केले आहेत.