Pune News : पुणे : पीएमपीएमएल बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बसप्रवास करताना पैशांचे पाकीट घरीच विसरले असेल, किंवा कंडक्टरला देण्यासाठी सुट्टे पैसे नसतील, तर टेंन्शन घेऊ नका… कारण आजपासून कॅशलेस तिकिटाची सुविधा सुरु झाली आहे. पीएमपीएमएल बसमध्ये ऑनलाईन पेमेंटद्वारे तिकीट काढता येईल. रविवारी सकाळपासून ऑनलाईन तिकीट सेवा सुरू झाली आहे. प्रवाशांना UPI QR कोड स्कॅन करून तिकिटाचे पैसे देता येणार आहेत. तुम्ही गुगल पे, फोन पे यासारख्या पेमेंट अॅपचा वापर करून देखील तिकीट काढू शकता. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच या सेवेचे उद्घाटन केले.
UPI QR कोड स्कॅन करून तिकिटाचे पैसे देता येणार
पीएमपीएमएल अर्थात पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या बस सेवेने कात टाकली आहे. बसमध्ये विना कंडक्टार बससेवा सुरु आहे. पीएमपीएमएलचे अध्यक्ष सचिंद्र प्रताप सिंह यांनी स्वतः बसमधून प्रवास करून चालक, वाहकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न वेळोवेळी केला आहे. (Pune News ) शनिवार, रविवारी अधिकाऱ्यांनी बसमधून प्रवास करण्याचे आदेश दिले. आता कॅशलेस तिकिटाची सुविधा पीएमपीएमएलने आजपासून सुरु केली आहे. त्यामुळे प्रवाशांना आता खिशात पैसे ठेवण्याची गरज भासणार नाही.
कॅशलेस तिकिटाची सुविधा यशस्वी होण्यासाठी १६ ते ३० सप्टेंबर दरम्यान बाणेर डेपो अंतर्गत प्रायोगिक तत्त्वावर चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर शहरातील सर्वच बससेवेत हा प्रयोग राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. या सेवेमुळे पुणेकर प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. (Pune News ) पीएमपीएमएल बसने प्रवास करायचा म्हणजे प्रवाशी आणि कंडक्टर यांच्यात अनेक वेळा सुट्या पैशांवरुन वाद होत असतात. परंतु आता ऑनलाईन तिकीट सुरु झाल्यामुळे हे वाद थांबणार आहेत. या सेवेमुळे खिशात पैसे नसतानाही बसमधून प्रवास करता येणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुण्यात आठ महिन्यांत १४ हजार ७२ नागरिकांना श्वानदंश
Pune News : हंगामाच्या समाप्तीला पुण्यात मेघगर्जनेसह पाऊस बरसणार
Pune News : प्रेयसीशी लगट करत असल्याच्या संशयावरून तरुणाचा खून; आरोपीला जन्मठेप