Pune News : पुणे : प्रसिद्ध कवी, गीतकार नामदेव धोंडो महानोर (वय-८१) यांचे आज गुरुवारी (ता.३) पुण्यात निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने साहित्य विश्वावर शोककळा पसरली आहे.
ज्येष्ठ कवी नामदेव महानोर हे गेल्या काही दिवसांपासुन किडनीच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. प्रकृती ढासळल्याने त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. उपचारांदरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे.
उद्या मूळगावी अंत्यसंस्कार
नामदेव धोंडो महानोर यांचा पळसखेडा येथे १६ सप्टेंबर १९४२ साली जन्म झाला होता. पळसखेडा, पिंपळगाव, शेंदुर्णी येथे त्यांनी शालेय शिक्षण घेतले. (Pune News ) महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुढे ते जळगावला गेले. पहिले वर्ष संपताच त्यांना पुन्हा गाव खुणावू लागला. त्यांनी शालेय शिक्षण थांबवण्याचा निर्णय घेतला अन् पुन्हा गाव गाठला. पण तिथे त्यांना जीवनाचा सूर गवसला. नजरेला दिसणारा निसर्ग त्यांनी शब्दात मांडला अन् महाराष्ट्राला ‘रानकवी’ मिळाला.
ना.धों. महानोर यांचा लेखनी जेव्हा चालायची तेव्हा खुद्द निसर्ग कागदावर रेखाटला जायचा. म्हणूनच साहित्य विश्वाने त्यांना रानकवी ही उपाधी दिली. (Pune News ) ना.धों. यांच्या लिखाणावर बालकवींच्या साहित्याचा प्रभाव जाणवतो.
अजिंठा, गंगा वाहू दे निर्मळ, जगाला प्रेम अर्पावे, दिवेलागणीची वेळ, पावसाळी कविता, रानातल्या कविता, हे कविता संग्रह लिहिला आहे.
दरम्यान, ग्रामीण जीवन शब्दबद्ध करणारा, गावगाड्यातील गोष्टी सोप्या शब्दात मांडणारा संवेदशील माणूस हरपल्याची भावना साहित्य विश्वातून व्यक्त होत आहे. (Pune News ) उद्या त्यांच्या पार्थिवावर मूळगावी पळसखेड (ता. कन्नड, जि.छत्रपती संभाजीनगर) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पावसाळ्यात अनावश्यक रस्ते खोदाई केल्यास तर खबरदार..! महापालिका कारवाई करणार
Pune News : लोहगाव परिसरातून १ कोटींचे अफिम जप्त करून एका तस्करास अटक