Pune News : पुणे : आंतरराष्ट्रीय शाळेचा दर्जा प्राप्त झालेल्या वाबळेवाडी शाळेमधील तत्कालीन मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांच्यावर जिल्हा परिषद सदस्यांनी आरोप केले होते. त्यावर चौकशी समिती नियुक्ती केली गेली. या चौकशी समितीचा निकाल हाती आला आहे. अनियमितता प्रकरणात तत्कालीन मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांना पुणे जिल्हा परिषदेने दोषमुक्त केले आहे. वारे यांच्यावरील कोणतेही आरोप सिद्ध न झाल्याचा अहवाल विभागीय चौकशी समितीने पुणे जिल्हा परिषदेला सादर केला. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी वारे हे दोषमुक्त असल्याचे आदेश प्रसिद्ध केले.
विभागीय चौकशी समितीने सादर केला आरोप सिद्ध न झाल्याचा अहवाल
वाबळेवाडी शाळेमधील मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांनी जिल्हा परिषदेच्या शाळांना वेगळी ओळख निर्माण करुन दिली. आंतरराष्ट्रीय शाळा दर्जाप्राप्त या शाळेने वाबळेवाडी पॅटर्न म्हणून राज्यात ओळख मिळवली. शाळेचा शैक्षणिक दर्जा वाढवून आंतरराष्ट्रीय पातळीच्या सुविधा त्यांनी दिल्या. त्यांच्या कार्याची दखल देशात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली. पुणे जिल्ह्यातील वाबळेवाडी शाळेमधील तत्कालीन मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांच्यावर जिल्हा परिषद सदस्यांनी आरोप केले होते. (Pune News) या पार्श्वभूमीवर तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी तत्कालीन मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांचे तात्पुरते निलंबन करून त्यांची विभागीय चौकशी लावली होती. वाबळेवाडी शाळेचा मुद्दा विधानसभेतही अनेकवेळा उपस्थित करण्यात आला होता. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: खुलासा करून हे प्रकरण अधिक लांबणार नसल्याची ग्वाही दिली होती. त्यावर चौकशी समिती नियुक्ती केली गेली. या चौकशी समितीचा निकाल आला आहे. त्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी दिली.
दरम्यान, या प्रकरणाची तब्बल दोन वर्षे विभागीय चौकशी सुरू होती. अखेर विभागीय चौकशी समितीने वारे यांच्यावर झालेला हलगर्जीपणा, कर्तव्यात कसूर, प्रशासकीय कामात निष्काळजीपणासह कोणतेही आरोप सिद्ध होत नसल्याचे लेखी कळवले.(Pune News) त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी वारे यांना सर्व आरोपांतून दोषमुक्त करून निलंबन कालावधी सेवाकाळ म्हणून गृहीत धरत असल्याचा आदेश नुकताच जारी केला. दरम्यान, वारे यांची खेड तालुक्यातील जालिंदरनगर जिल्हा परिषद शाळेत बदली करण्यात आली आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडून शासनाचे आदेश नसतानाही शालेय प्रवेशासाठी देणगी रक्कम गोळा करणे, वर्गणी गोळा करणे, वर्गणी न दिल्यास शालेय प्रवेश नाकारणे, (Pune News) शाळा व्यवस्थापन समितीच्या कार्यक्षेत्राव्यतिरिक्त निधी संकलन करणे व खर्च करणे, प्रवेशावेळी घेतलेली रक्कम ग्रामस्थांना परत न करणे, निविदा न मागविणे, संशयास्पद आर्थिक व्यवहार करणे आदी आरोप करण्यात आले होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : माहिती अधिकार दिन सर्वत्र साजरा करावा; राहुलकुमार अवचट यांची मागणी