Pune News : पुणे : दक्षिण कोरियात नृत्य शिकायला जायची त्यांची इच्छा होती. त्यासाठी विश्रांतवाडी भागातील दोन शाळकरी मुली घरातून पळून गेल्या. मुंबईतील दादर परिसरात दोघी रेल्वेने आल्या. मुंबईतील एका टॅक्सीचालकाने या दोन मुलींना गोंधळलेल्या अवस्थेत पाहिले आणि पोलिसांना फोन करून माहिती दिली. टॅक्सीचालकाच्या प्रसंगावधानामुळे विश्रांतवाडीतील धानोरी आणि टिंगरेनगर परिसरात वास्तव्याला असणाऱ्या या मुलींना विश्रांतवाडी पोलिसांनी मुंबई पोलिसांच्या मदतीने सुखरुप घरी आणून पालकांच्या ताब्यात दिले. विश्रांतवाडी भागातील एका शाळेत दोन्ही मुली आठवी इयत्तेत शिकत आहेत.
टॅक्सीचालकाच्या प्रसंगावधानामुळे लागला शोध
एका ध्वनिचित्रफितीतून या मुलींना दक्षिण कोरियातील एका नृत्य संस्थेची माहिती मिळाली होती. दरम्यान, या पैकी एका मुलीच्या आजीने तिला औषध आणण्यासाठी पाचशे रुपये दिले होते. ओैषधे खरेदी न करता ही मुलगी मैत्रिणीकडे गेली. मैत्रिणीकडे थोडा वेळ अभ्यास केला आणि बहाणा करुन दोघी घराबाहेर पडल्या. दोघींनी पुणे रेल्वे स्थानक गाठले. (Pune News) रेल्वेने दोघी मुंबईतील दादर स्थानकावर उतरल्या. दरम्यान, एका मुलीच्या आजीने पोलिसांकडे मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. आजीच्या मोबाइल क्रमांकावर एका टॅक्सीचालकाने संपर्क साधला. पोलिसांनी त्वरित तपास सुरू केला.
टॅक्सीचालकाने मुली घरातून पळाल्याची माहिती पोलिसांना दिली. विश्रांतवाडी पोलीस ठाण्यातील सहायक निरीक्षक अन्सार शेख यांनी मुंबईतील माटुंगा पोलिसांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर विश्रांतवाडी पोलीस ठाण्यातील पथक मुंबईकडे रवाना झाले. (Pune News) दोघींना मुंबईतून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर पोलिसांचे पथक पुण्यात आले. मुलींना पालकांच्या ताब्यात देण्यात आले.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, या दोन मुलींना दक्षिण कोरियात नृत्य शिकायला जायचे होते. मुंबईतील दादर परिसरात दोघी रेल्वेने आल्या. टॅक्सीचालकाने दोन मुलींना पाहिले. त्या गोंधळलेल्या होत्या. दोघी घरातून पळून आल्या होत्या. (Pune News) टॅक्सीचालकाने ही बाब हेरली आणि त्वरित पोलिसांशी संपर्क साधला, असे सहायक पोलीस निरीक्षक अन्सार शेख यांनी सांगितले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : निरक्षरांच्या सर्वेक्षणावर माध्यमिक शाळांतील शिक्षकांचाही बहिष्कार…
Pune News : निवृत्त सहायक पोलीस आयुक्त अनिस काझी यांचे अल्प आजाराने निधन