Pune News चंदननगर (पुणे) : नगररस्त्यावर चंदननगर येथील बीआरटीमुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. रहादारीच्या रस्त्यावर नुसते वाहन जरी बंद पडले तरी लांबलचक वाहनांच्या रांगा लागून मोठी वाहतूक कोंडी होत असते. (Pune News) बीआरटीच्या भिंतीला धडकून जड मालवाहतुकीचा ट्रक रस्त्यावर उलटला. यामुळे नगर रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. तसेच याच ठिकाणी गेल्या बारा दिवसांपूर्वी तेलाचा टँकर उलटल्याने दिवसभर नगररस्ता येरवडा ते वाघोली दरम्यान कोंडीत अडकला होता. तशीच स्थिती पुन्हा उद्भवली असून मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. (Pune News)
वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रासले…
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून वाघोलीच्या दिशेला जाताना जड वाहतुकीचा ट्रक रविवारी रात्री आकरा वाजण्याच्या दरम्यान चंदननगर भुयारी मार्गालगतच्या बीआरटी सिमा भिंतीला धडकून अडकला. यामुळे पुण्याबाहेर जाणारी खराडी जुना जकातनाका व शास्रीनगर पर्यंत दोन्ही बाजूंनी मोठी कोंडी झाली होती.
तब्बल पंधरा तासानंतर ट्रक हाटविण्यात आला. तोपर्यंत नगर रस्त्यावर प्रचंड कोंडी झाली होती. नगर रस्त्यावर बीआरटी मार्ग रस्त्याच्या मध्यभागी न करता जसा रस्ता उपलब्ध तसा करून बीआरटी प्रकल्प राबवून प्रशासनाने नगररस्त्याला कोंडीत ढकलले.
रविवारपासून शास्रीनगर ते विमाननगर दरम्यान बीआरटी काढण्यास सुरूवात केली आहे. मात्र विमाननगर ते खराडी जुना जकात नाका दरम्यानचाही बीआरटी मार्ग हाटविणे गरजेचे असून दररोज येरवडा ते खराडी या सहा किमीच्या रस्त्यावर तासंतास वाहतुक कोंडी होत आहे.