Pune News : पुणे : आझादी का अमृत महोत्सवच्या अंतर्गत भारत सरकारद्वारे २०२२ मध्ये ”हर घर तिरंगा” ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेच्याच्या अंतर्गत पुणे ग्रामीण डाक विभागाच्या वतीने भारतीय स्टार क्रिकेटर केदार जाधव यांना तिरंगा दिला आहे. अशी माहिती पुणे जिल्हा (ग्रामीण) डाकघर विभागाचे अधीक्षक बाळकृष्ण एरंडे यांनी दिली आहे.
सुमारे ४९००० झेंडे पोस्ट ऑफिस द्वारा वितरीत
”हर घर तिरंगा” या मोहिमेच्या अंतर्गत नागरिकांच्या हृदयात देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी, राष्ट्र उभारणीसाठी ज्यांनी अथक परिश्रम घेतले आहे. त्यांच्या योगदानाचे स्मरण करून प्रत्येक भारतीयांच्या घरामध्ये भारताचा राष्ट्रध्वज फडकावण्यास प्रोत्साहित केले जात आहे. Pune News
यावर्षीसुद्धा १३ से १५ ऑगस्ट २०२३ या कालावधीत भारताच्या स्वातंत्र्य दिनाचे उत्साहाने आणि देशभक्तीने साजरा वारण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी ‘हर घर तिरंगा’ मोहीम आयोजित केली आहे. या मोहिमेच्या महत्त्वाबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची जबाबदारी भारत सरकारने टपात विभागावर सोपविली आहे. Pune News
दरम्यान, सर्व पोस्ट ऑफिस मध्ये राष्ट्रीय ध्वज विक्रीसाठी फक्त २५ रुपयांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. आणि आतापर्यंत सुमारे ४९००० झेंडे पोस्ट ऑफिस द्वारा वितरीत करण्यात आहे आहेत. या दृष्टीने नागरिकांचा प्रतिसाद पाहता या रविवारी (ता.१३) तिरंगा ध्वज विक्री आणि डीलीव्हरी साठी पुणे जिल्ह्यातील सर्व पोस्ट ऑफिस सुरु राहतील. Pune News
कोणाची झेंड्याची मोठी मागणी असेत तर त्यांनी पुढील दूरध्वनी क्रमांका ०२०-२५५१०१२५ यावर संपर्क साधावा व वरील संधीचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा. असे आवाहन पुणे जिल्हा (ग्रामीण) डाकघर विभागाचे अधीक्षक बाळकृष्ण एरंडे यांनी केले आहे.