Pune News : सणसवाडी : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा अभियानांतर्गत शिरूर हवेली विधानसभा क्षेत्रात भाजपच्या वतीने तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली. भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे यांच्या नेतृत्वाखाली आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या या रॅलीत युवक-युवतींचा सहभाग लक्षणीय होता. तुळापूर येथील स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची बलिदान भूमी येथून निघालेल्या या रॅलीचा समारोप तळेगाव ढमढेरे येथील विष्णू गणेश पिंगळे स्मारक येथे झाला.
युवक-युवतींचा लक्षणीय सहभाग
तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारकाजवळून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या हस्ते सकाळी या तिरंगा बाईक रॅलीचा शुभारंभ झाला. (Pune News) तत्पूर्वी तुळापुरातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या शिल्पांना जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. हजारो नागरिक या बाईक रॅलीमध्ये सहभागी झाले होते. खास करून युवकांचा उत्साह वाखाणण्यासारखा होता.
महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी भारत माता की जय, जय श्रीराम अशा घोषणा देत होते. देशभक्तीपर गीतांनी वातावरण भारले होते. सर्वांच्या हातात, बाईकवर, वाहनांवर तिरंगा ध्वज डौलाने फडकत होता. तुळापूर येथून सुरू झालेली ही बाईक रॅली शिरूर हवेली विधानसभा क्षेत्रातील विविध भागांतून मार्गस्थ होताना ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले. (Pune News) तळेगाव ढमढेरे येथील हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे चौकामध्ये तिरंगा बाईक रॅलीची सांगता झाली.
जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, घोडगंगा साखर कारखान्याचे संचालक दादा पाटील फराटे, माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पंलाडे, भाजपा हवेली अध्यक्ष संदीप भोंडवे, शिरूर तालुकाध्यक्ष प्रदीप सोनवणे यांनी याठिकाणी हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी केली. (Pune News) दरम्यान, गेल्या वर्षी देशाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला. यावर्षी या महोत्सवाचा सांगता समारंभ सर्वत्र साजरा केला जात आहे. प्रत्येकाच्या मनात देशाबद्दल अभिमान आहेच. हा अभिमान वृद्धिंगत होऊन कष्टाने मिळवलेले स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याची जाणीव प्रत्येकाच्या मनात असायला हवी, असे आवाहन माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनी या वेळी केले.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष रवींद्र कंद, संचालक सुदर्शन चौधरी, तिरंगा रॅलीचे आयोजक संदीप सातव, महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चाचे उपाध्यक्ष गणेश कुटे, हवेली महिला अध्यक्षा पूनम चौधरी, शिरूर महिला अध्यक्षा वैजयंती चव्हाण, शिरूर भाजपा सरचिटणीस संपत गव्हाणे आणि शेकडो कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : कोंढव्यात अल्पवयीन मुलाला धमकी देत अत्याचार; तरुणीवर गुन्हा दाखल
Pune News : येरवड्यात तरुणावर कोयत्याने हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल