Pune News : पुणे : बेकायदा पिस्तुल खरेदी करून, ते मित्राला दाखवताना पिस्तुलातून गोळी सुटल्याने मित्र गंभीर जखमी झाल्याची घटना खडकवासला परिसरात नुकतीच घडली. ही घटना ताजी असतानाच सिंहगड रोड पोलिसांनी बेकायदेशीररित्या पिस्टल आणि जिवंत काडतुसे बाळगणार्या व्यक्तीला सिंहगड रोडवरील दळवीवाडा फाटा येथील डी. के. बिर्याणी येथून अटक केली आहे. त्याच्याकडून पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. या प्रकारामुळे या परिसरात बेकायदा पिस्टल विक्री चालत असल्याचे उघड होत असून, अद्याप या प्रकरणी कारवाई झालेली नसल्याचे चित्र आहे.
सिंहगड रोड पोलिसांची कारवाई
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सागर महादेव चौधरी (वय ३०, रा. स्वरसारा कॉम्प्लेक्स, फ्लॅट नं. ४०३, नर्हे इंडस्ट्रीज, नर्हे, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. (Pune News) सिंहगड रोड पोलीस हे परिसरात पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार देवा चव्हाण, सागर शेडगे आणि अमोल पाटील यांना आरोपी पिस्टल आणि जिवंत काडतुसे बाळगत असल्याची माहिती मिळाली. खात्री पटल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला दळवीवाडा फाटा येथील डी. के. बिर्याणीजवळून ताब्यात घेतले.
दरम्यान, आरोपीची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे ४० हजार रूपये किंमतीचे एक गावठी पिस्टल आणि एक हजार रूपये किंमतीची २ जिवंत काडतुसे आढळली. (Pune News) पोलिसांनी ती जप्त केली असून, त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस उपायुक्त सुहेश शर्मा, सहाय्यक पोलीस आयुक्त अप्पासाहेब शेवाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जयंत राजुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : आई आणि प्रेयसीच्या वादाने तरूण भलताच हैराण; थेट झाडावरच जाऊन बसला अन्…