Pune News : पुणे : बाजारात नवीन लागवड केलेल्या टोमॅटोची आवक सुरू झाली आहे. रविवारी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात ११ हजार टोमॅटोच्या पेट्यांची आवक झाली. यामुळे किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर कमी झाले आहेत. गेल्या काही दिवसांत टोमॅटोची आवक दुपटीने वाढल्याने घाऊक बाजारात दहा किलो टोमॅटोला प्रतवारीनुसार २०० ते ३०० रुपये असे दर मिळाले आहेत. काकडी, फ्लॉवर, ढोबळी मिरची, कारले या फळभाज्यांच्या दरात देखील घट झाली आहे. निर्यातशुल्क वाढीनंतर कांद्याच्या दरातही घट झाली आहे.
निर्यातशुल्क वाढीनंतर कांद्याच्या दरात घट
गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात रविवारी (ता. २० ऑगस्ट) राज्य, तसेच परराज्यांतून ११० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. फळभाज्यांची आवक चांगली होत असून, बहुतांश फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. (Pune News) कर्नाटकमधून १२ टेम्पो हिरवी मिरची, गुजरात, कर्नाटकमधून मिळून ४ टेम्पो कोबी, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडूतून ४ टेम्पो शेवगा, कर्नाटकातून ४ टेम्पो घेवडा, गुजरातमधून २ टेम्पो भुईमूग शेंग, इंदूरमधून १० टेम्पो गाजर, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून १० टेम्पो लसूण, आग्रा, इंदूर तसेच पुणे विभागातून मिळून ४५ ट्रक बटाट्याची आवक झाली.
पुणे विभागातून टोमॅटो ११ हजार पेटी, सातारी आले ७०० गोणी, फ्लॉवर १० टेम्पो, कोबी ५ टेम्पो, पुरंदर, वाई, सातारा भागातून मटार ८ टेम्पो, भेंडी ८ टेम्पो, (Pune News) गवार ५ टेम्पो, कोबी ५ टेम्पो, भुईमूग शेंग, १०० गोणी, ढोबळी मिरची १० टेम्पो, काकडी १० टेम्पो, तांबडा भोपळा १० टेम्पो, कांदा ६० ट्रक अशी आवक झाली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पुणे शहर सरचिटणीसपदी डॉ. सुनीता मोरे
Pune News : पुण्यातील ५० गुंड टोळ्यांविरुद्ध आयुक्तांची धडाकेबाज मोक्का कारवाई