Pune News : पुणे : गणपती मूर्तीचे विसर्जन नदीपात्रात, तलावात, कालव्यात करण्यात येऊ नये, असे आवाहन पुणे महानगरपालिकेने केले आहे. या आवाहनाला नागरिकांकडून प्रतिसाद मिळत असल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी सांगितले.
दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन
दरम्यान, बुधवारी (ता. २०) दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले. पुणे शहरामध्ये दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. जलप्रदूषण रोखण्यासाठी नदी, तलावात विसर्जन करु नये, असे आवाहन महानगरपालिकेकडून दरवर्षी करण्यात येते. (Pune News) यंदाही महापालिकेने नदीमध्ये विसर्जन न करण्याचे आवाहन केले होते. याशिवाय प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना बंदी असल्याने त्याचे पाण्यात विसर्जन होणार नाही, यासाठी पालिका प्रशासनाने विशेष दक्षता घेतली होती.
महानगरपालिकेने गणपती विसर्जनासाठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ४२ विसर्जन हौद, २६५ ठिकाणी ५६८ लोखंडी टाक्या, २५२ गणेशमूर्ती संकलन केंद्र आणि दीडशे फिरते हौद असे नियोजन केले आहे. परंतु फिरते हौद पाचव्या दिवसापासून उपलब्ध होणार आहेत. (Pune News) त्यामुळे नागरिकांनी दीड दिवसाच्या गणपतीचे घरच्या घरी किंवा महापालिकेच्या नदीपात्रातील विसर्जन हौदामध्ये विसर्जन करण्यावर भर दिला. जलस्रोतांमध्ये विसर्जन करण्यास मनाई असल्याने नागरिकांनी घरातच किंवा जवळच्या कृत्रिम हौदात, लोखंडी टाक्यांमध्ये गणपती बाप्पाचे विसर्जन केले. तर काहींनी मूर्ती दान करुन समाजभान जपले.
दरम्यान, फिरते विसर्जन हौद आणि निर्माल्य कलश उपलब्ध नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : फटाके घेऊन रेल्वेतून प्रवास; सुरक्षा दलाच्या श्वानाची अचूक नजर… प्रवाशाला अटक!
Pune News : पतीच्या मारहाणीला कंटाळून बिबवेवाडीत नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
Pune News : मौजमजेसाठी हडपसर परिसरात दुचाकी चोरी; वाहन चोरी पथकाने आवळल्या मुसक्या