Pune News : पुणे : मुक्या प्राण्यांवर दया दाखवणारे अनेक प्राणीप्रेमी असतात. संकटात सापडलेल्या प्राणी-पक्षांना वाचवून त्यांना त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी ते धडपडत असतात. अशीच एक घटना शहरातील पर्वती विभागाच्या लक्ष्मीनगर भागात एका श्वानाबाबत घडली. हा श्वान लोकवस्तीतून जाणाऱ्या ड्रेनेजमध्ये अडकला होता. तो सतत भुंकत होता. स्थानिक रहिवाशांना श्नानाच्या भुंकण्याचा आवाज काही दिवसांपासून येत होता; मात्र, हा आवाज कोठून येतो, याचा उलगडा काही केल्या होत नव्हता. अखेर आवाजाच्या रोखाने गेल्यानंतर हा श्वान ड्रेनेजमध्ये अडकल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले, आणि अग्निशामक दलाच्या जवानांच्या मदतीने श्वानाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.
पर्वती परिसरातील घटना
पुण्याच्या पर्वती विभागाच्या लक्ष्मीनगर भागातील स्थानिकांना काल रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास श्वानाच्या भुंकण्याचा आवाज सतत कानी पडत होता. काहींनी आवाज कोठून येतो, (Pune News) याचे बारकाईने निरीक्षण केल्यानंतर हा आवाज लोकवस्तीतून जाणाऱ्या एका ड्रेनेजमधून येत असल्याची त्यांची खात्री पटली. एक श्वान ड्रेनेजमध्ये अडकल्याचे निदर्शनास आल्यानंतर राहिवाशांनी तत्काळ अग्निशामक विभागाशी संपर्क साधला. जनता वसाहत अग्निशामक विभागाचे जवान तत्काळ घटनास्थळी हजर झाले.
घटनास्थळी पाहणी केल्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. श्नानाचा आवाज ज्या ड्रेनेजमधून येत होता, ते ड्रेनेज पॅकबंद होते. त्याचे झाकण उघडले जात नव्हते. यावेळी स्थानिक नागरिक मदतीला धावून आले. ड्रेनेजचे दुसरे झाकण उघडण्यात यश आले. (Pune News) अडकलेला श्वान सुटकेच्या आशेने उघडलेल्या झाकणाजवळ येऊन थांबला होता. मात्र, बघ्यांची पाहून तो बाहेर येण्यास घाबरत होता. अखेर जवानांनी श्वानाच्या पायाला पकडून त्याला ड्रेनेजच्या बाहेर काढले.
दरम्यान, श्वानाला ड्रेनेज लाईनमधून बाहेर काढताना झालेल्या झटापटीत त्याच्या मानेला दुखापत झाली आहे. बाहेर आल्यानंतर त्याची शारिरीक स्थिती पाहता, तो किमान ६ ते ७ दिवस ड्रेनेज चेंबरमध्ये अडकल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सध्या उपचारासाठी श्वानाला रेस्क्यू पथककडे पाठवण्यात आले आहे. (Pune News) तसेच स्थानिक नागरिकांनी दाखविलेल्या भूतदयेचे कौतूक होत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : जंगली रमीचा नाद कॅब चालकाला पडला महाग; २० हजार रुपये हरल्याने आत्महत्या…!