Pune News : पुणे : पुणे जिल्ह्यात साहसी पर्यटनासाठी अनेक जण येत असतात. पुण्यापासून सर्वात जवळचा किल्ला असलेल्या सिंहगडावर सुटीच्या दिवशी अनेक जण गर्दी करतात. गर्दीमुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी आता नवीन सुविधा सुरु करण्यात आली आहे. यामुळे पर्यटकांची सोय होणार आहे. सिंहगडावर जाण्यासाठी आता ऑनलाईन पद्धतीने तिकीट काढण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. यामुळे किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांसाठी चांगली सुविधा निर्माण झाली आहे.
पर्यटकांसाठी ऑनलाइन तिकीटाची खास सोय!
पुणे शहरातून अवघ्या २५ किलोमीटर अंतरावर सिंहगड किल्ला आहे. तासाभरात किल्ला गाठता येतो. किल्ल्यावर जाण्यासाठी पीएमटीच्या बसेसची सुविधा देखील आहे. यामुळे पुणेकरांची सोय झाली आहे. सुटीच्या दिवशी किल्ल्यावर अधिकच गर्दी होते. (Pune News ) अशावेळी बसने जाणाऱ्या पर्यटकांना तिकीट काढण्यासाठी रांगेत थांबावे लागते. आता पुणे वनविभागाकडून ऑनलाइन शुल्क भरण्याची सुविधा सुरु करण्यात आल्यामुळे पर्यटकांची गैरसोय दूर होणार आहे.
दरम्यान, ऑनलाईन बुकींगची सुविधा मागील आठवड्यात सुरु झाल्यानंतर आठवडाभरात सुमारे ६०० पर्यटकांनी ऑनलाइन शुल्क भरले. (Pune News ) ऑनलाईन बुकींगच्या माध्यमातून वनविभागाला एकूण ३८ हजार ७५० रुपयांचे उत्पन्न मिळाले. पर्यटकांनी या सेवेबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
सिंहगडावर महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ म्हणजेच एमटीडीसीचे रिसोर्ट आहे. या ठिकाणी पर्यटकांना राहण्याची आणि जेवणाची सुविधा उपलब्ध आहे. हे रिसोर्ट सिंहगडावरच्या हवा पॉईंटजवळ आहे. एमटीडीसीच्या https://www.maharashtratourism.gov.in या वेबसाईटवर जाऊन त्यासाठी बुकींग करता येते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : अल्पवयीन मुलाला फरशीने मारहाण; चौघांविरोधात गुन्हा दाखल
Pune News : पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांना रक्षाबंधनाची सुट्टी जाहीर
Pune News : पैसे घेऊनही घराचा ताबा नाही; ज्येष्ठ महिलेची फसवणूक; दोघांवर गुन्हा दाखल