तुषार सणस
Pune News : पुणे : खंडाळा तालुक्यातील विंग येथील रियटर इंडिया प्रा. लि. कंपनीतील ३४८ कायमस्वरूपी कामगार संपावर गेले आहेत. या घटनेला ४० दिवस उलटूनही अद्याप तोडगा निघालेला नाही. कंपनी सातारा जिल्ह्यात आहे; पण कामगारांना पुणे जिल्ह्यातील धांगवडी येथे सभा घ्यावी लागत आहे. कामगारांवर ४० दिवस संप करण्याची वेळ का येते, त्यांच्या आंदोलनात त्याचे कुटुंबीय का सहभागी होतात, लोकशाही जिवंत आहे का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
लोकशाही जिवंत आहे का? आंदोलकांचा सवाल
संघटनेतील कामगारांना योग्य दर्जा न देता, कायद्याचे संरक्षण मिळू नये यासाठी व्यवस्थापन प्रयत्न करत आहे. व्यवस्थापन विचारांची संघटना नसल्याने, संघटना बरखास्त करण्यासाठी कामगारांवर खोटे-नाटे आरोप करून निलंबित केले जात आहे. (Pune News) व्यवस्थापन अन्यायकारक निर्णय कामगारांवर थोपवून सर्व कामगारांनी व्यवस्थापन घेईल तो निर्णय स्विकारावा, अशी त्यांची इच्छा असल्याने विचारांशी सहमत असलेली मोजक्या सदस्यांची संघटना कंपनी व्यवस्थापन मान्य करत आहे. अन्याय सहन न करणारी रियटर इंडिया एम्प्लॉइज फेडरेशन स्वीकारली जात नाही.
व्यवस्थापनाकडून होत असलेली अन्यायकारक वागणूक थांबवत, कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री, उद्योगमंत्री यांना निवेदने दिली आहेत. परंतु या निवेदनाची कोणीही दखल घेत नसल्याने कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. रियटर इंडिया कामगारांचा संप सुरू झाला की सातारा जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू होतो. कामगारांच्या लोकशाही व शांतता मार्गाने आंदोलन करण्यावर एक प्रकारे बंदी घालत, कंपनी व्यवस्थापनाच्या मुजोरपणाला पाठिंबा दिला जात आहे. (Pune News) कामगारांचा आवाज दाबण्याचे काम केले जात आहे. यामुळे कामगार शांत बसणार नसल्याचे सांगत कंपनीतील कामगारांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.
लोकशाही मार्गाने कामगार व महिलांनी रियटर इंडिया प्रा. लिमिटेड कंपनी विरोधात संप पुकारला आहे. कामगारांवर कंपनी व्यवस्थापन जो अन्याय करत आहे, त्याविरोधात सर्व कामगारांच्या पत्नींनी शिरवळ पोलीस स्टेशन याठिकाणी लेखी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीचे झाले काय, असा प्रश्न सर्व महिलांनी केला असता, त्याबाबत चौकशी सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, पोलीस स्टेशनच्या आवारात तुम्ही थांबू नका, असे सांगत पोलिसांनी महिलांना सहकार्य न करता परत पाठविल्याचे महिलांनी सांगितले. या अन्यायकारक वागणुकीमुळे कामगार कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. शेवटपर्यंत हा लढा सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रियटर कंपनीच्या सर्व कामगारांसोबत संपूर्ण कुटुंब देखील उपोषणाला बसणार असल्याची माहिती या वेळी महिलांनी दिली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : तब्बल पाच कोटी रुपये किंमतीची व्हेल माशाची उलटी जप्त