Pune News : पुणे : आळंदीत ज्ञानेश्वर माऊलींचा प्रस्थान सोहळा सुरू असतानापालखी सोहळ्याला गालबोट लावणारी घटना घडली आहे. मंदिर व्यवस्थापनाने घेतलेल्या एका निर्णयामुळे वारकरी आणि पोलिसांमध्ये वाद झाल्याचं पहायला मिळालं. यावेळी वारकऱ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. त्यानंतर आणखी व्हिडीओ समोर आला असून त्यामध्ये वारकऱ्यांनी पोलिसांना तुडवून मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे. (The video before ‘that’ indecent in Alandi; has surfaced; What exactly happened?)
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे रविवारी (दि. 11) आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान झाले. पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रधान जिल्हा न्यायाधीश, धर्मादाय आयुक्त, मंदिर प्रमुख विश्वस्त यांच्यासोबत तीन बैठका पार पडल्या. (Pune News) मागील वर्षी पालखी सोहळ्यात गर्दीमुळे चेंगरा चेंगरी झाली होती. अशा परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी मंदिर समिती आणि जिल्हा प्रशासनाने विशेष खबरदारी घेण्याचा निर्णय घेतला.
वारकऱ्यांनी पोलिसांना अक्षरशः तुडवून मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला
वारकऱ्यांनी पोलिसांना अक्षरशः तुडवून मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला. याबाबतचा व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये पोलीस वारकऱ्यांना अडवण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र वारकऱ्यांनी अचानक पोलिसांना ढकलून त्यांना तुडवून मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला. (Pune News) त्यानंतर पोलिसांनी जबरदस्तीने मंदिरात जाणाऱ्या वारकऱ्यांना बाजूला ढकलून पांगवले. दरम्यान, पोलिसांनी लाठ्या उगारल्या असल्याचा एक व्हिडीओ सुरुवातीला समोर आला होता.
याबाबत पोलिस आयुक्त, विनयकुमार चौबे म्हणाले, पालखी प्रस्थान सोहळा हा दरवर्षी आयोजित होतो. आजही मानाच्या 56 पालख्या आल्या होत्या. गेल्यावर्षी चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली होती आणि त्यावेळी काही महिला सुद्धा जखमी झाल्या होत्या.(Pune News) त्यामुळे यावर्षी प्रधान जिल्हा न्यायाधीश, धर्मादाय आयुक्त, मंदिर प्रमुख विश्वस्त यांच्यासोबत 3 वेळा बैठका घेऊन गेल्यावर्षीसारखी परिस्थिती निर्माण होऊ नये, म्हणून प्रत्येक मानाच्या पालखीतील प्रत्येकी 75 जणांना प्रवेश देण्याचा निर्णय पूर्वीच घेण्यात आला आणि तसे नियोजन सुद्धा करण्यात आले. मानाच्या दिंडीप्रमुखांनी सुद्धा तो मान्य केला. त्यानुसार पासेस वितरित करण्यात आल्या.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : शरद पवारांना धमकी देणारा सागर बर्वे आहे तरी कोण? पोलीस तपासात महत्त्वाची माहिती उघड!
Pune News : पुण्यात तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करुन खून
Pune News : पुण्यात पत्रकारावर गोळीबार, १५ दिवसांपूर्वीच झाला होता हल्ला