Pune News : पुणे : पुणे-सातारा रस्तावर धावत्या स्विप्ट कारने अचानक पेट घेतल्याची धक्कादायक घटना पद्मावती बस स्थानकाजवळ शनिवारी (ता. १२) सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात सुदैवाने दाम्पत्यांचे प्राण वाचले आहे. मात्र या बर्निंग कारचा थरार पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
सुदैवाने दाम्पत्याचे वाचले प्राण
विनायक लिलाधर जाखोटीया (वय-३०) व पत्नी अवनी विनायक जाखोटीया (दोघेही रा. मुरमाड, कल्याण) असे अपघातातून सुखरूप वाचलेल्या दांपत्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनायक जाखोटीया हे व्यवसायिक आहेत. त्यांना रक्षाबंधन सणाला कामामुळे बहिणीकडे राखी बाधण्यासाठी येणे शक्य नव्हते.(Pune News ) म्हणून जाखोटीया हे पत्नीसह मार्केट यार्ड येथील गंगाधाम येथे राहणारी बहिण श्रुती विजय भट्टड हिच्याकडे आले होते.
दरम्यान, बहिणीच्या हातून राखी बांधून विनायक जाखोटीया हे सायंकाळी कल्याणला परत स्विप्ट (डिजेल एमएच ०५, डीएच ५५३१) कारने चालले होते. पुणे सातारा महामार्गाने कल्याणच्या दिशेने जात असताना त्यांची कार पद्मावती जवळ पोहचली असता, मोटारी मधून वास येऊ लागला. जाखोटीया यांनी समयसुचकता आणि प्रसंगाव धान राखत मोटार बाजूला घेतली. (Pune News ) आणि मोटारीतून तत्काळ बाहेर आले. मोटारीतील दोघेही खाली उतरताच मोटारीने मोठा पेट घेतला. बघता-बघता मोटार जळून खाक झाली.
त्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी मोटारीला लागलेली आग तत्काळ विझवली, त्यामुळे सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. (Pune News ) तर वाहतूक पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने मोटाररस्त्या च्या बाजूला करून घेत वाहतूक पूर्ववत केली.
यावेळी बोलताना विनायक जखोटीया म्हणाले, बहिणीने प्रेमाने बांधलेल्या धाग्यातील ताकद मला आज जीवनदान देऊन गेली आहे. (Pune News ) त्यांमुळे मी आणि मांझी पत्नी या अपघातातून सुखरूप बचावले आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : हर घर तिरंगा! भारतीय क्रिकेटर केदार जाधव यांना पुणे ग्रामीण डाक विभागाने दिला तिरंगा
Pune News : बाणेर रस्ता उद्यापासून ४ दिवस वाहतुकीसाठी बंद; हे आहेत पर्यायी मार्ग
Pune News : पुणे मेट्रो स्टेशन बांधकामावेळी कारच्या बोनेटवर लोखंड पडून भीषण अपघात