Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News : मुलांनो, ध्येयवेडे होऊन स्वप्नांचा पाठलाग करा; आमदार अशोक पवार यांचे आवाहन

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 13 August 2023, 11:11

अमोल दरेकर
Shirur News, सणसवाडी : शिरूर तालुका पूर्वी दुष्काळी भाग म्हणून ओळखला जात होता. त्या काळात मुलांनी शिक्षणाचे ध्येय उराशी बाळगून प्रशासकीय सेवेत या तालुक्याची वेगळी ओळख निर्माण केली. तुम्हीही भविष्यातील अधिकारी, व्यावसायिक आहात. त्यासाठी मोठी स्वप्ने पहा. ध्येयवेडे होऊन स्वप्नांचा पाठलाग करा, असे आवाहन आमदार अशोक पवार यांनी विद्यार्थ्यांना केले.

गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

शिरूर तालुक्यातील नरेश्वर शिक्षण प्रसारक संस्थेच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध परीक्षांमध्ये यश संपादन केले आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शनिवारी माध्यमिक विद्यालयाच्या मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडला. या वेळी मुलांशी मुक्त संवाद साधताना आमदार पवार बोलत होते.

या वेळी पुढे बोलताना अशोक पवार म्हणाले की, शालेय शिक्षणाबरोबरच आपण आपल्या अवतीभवती घडणाऱ्या घटना-घडामोडींची माहिती आत्मसात केली पाहिजे. सामान्यज्ञान वाढवण्यासाठी परिपाठ, प्रश्न मंजुषा यासारख्या स्पर्धांचे आयोजन करून मुलांचा बौद्धिक विकास करणे ही आजच्या काळाची गरज आहे.(Shirur News )  विद्यार्थ्यांनी सोशल मीडियापासून दूर राहून तंत्रज्ञानाचा वापर आपल्या शिक्षणासाठी केला पाहिजे. जीवनात यशस्वी होण्यासाठी यशस्वी लोकांच्या चारित्र्याचे वाचन करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी वाचनाची गोडी लावून घेतली पाहिजे.

 

पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांना यशाचा मुलमंत्र दिला. Success या इंग्रजी शब्दांचा अर्थ सांगत त्यांनी मार्गदर्शनाला सुरुवात केली. केवळ एखादी गोष्ट केल्याने जीवनात यशस्वी होता येत नाही. आपल्या शिक्षणाचा उपयोग आपण समाजाच्या हितासाठी करतो का, हे पाहणे म्हणजे आयुष्याचे यश आहे. आपल्या शिक्षणाचा उपयोग गावापासून देशापर्यंत झाला पाहिजे.

आपल्या परिसरात असणाऱ्या औद्योगिक क्षेत्राचा एक भाग होत, उत्तम उद्योजक होऊन तुम्ही यशस्वी होऊ शकता. (Shirur News) विद्यार्थीदशेत सोशल मीडियापासून लांब राहावे. गरजेपुरताच मोबाईलचा वापर करावा. वाचनालयाचा वापर जास्तीत जास्त करावा. सकस आहार, व्यायाम यासारख्या गोष्टी आत्मसात कराव्यात. यामुळे आपले जीवन सुखकर होईल.

या कार्यक्रमासाठी आमदार अशोक पवार, पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, व्याख्याते गणेश शिंदे, माजी उपसभापती आनंदराव हरगुडे, मार्केट कमिटीचे माजी संचालक दत्तात्रय हरगुडे, पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंडित दरेकर, संस्थेचे अध्यक्ष रंगनाथ हरगुडे, सचिव बाबासाहेब साठे, सरपंच सुवर्णा दरेकर, उपसरपंच दत्तात्रय हरगुडे, सदस्य राजेंद्र दरेकर, डॉ. मोहन हरगुडे, माजी सरपंच सुनंदा दरेकर, शशिकला सातपुते, तनुजा दरेकर, ललिता दरेकर, संतुलनचे बस्तू रेगे, रामदास दरेकर, दगडू दरेकर, नवनाथ दरेकर, अशोक हरगुडे, माजी सरपंच साहेबराव दरेकर, गोरख भुजबळ, प्राचार्य राधिका मेंगवडे, शाळा व्यस्थापन पदाधिकारी यासह मान्यवर व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन सणसवाडी ग्रामपंचायत आणि उद्योजक रामदास दरेकर मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले होते. (Shirur News ) प्रास्ताविक प्राचार्य राधिका मेंगवडे यांनी केले. सूत्रसंचालन उपशिक्षक काळुराम रणसिंग आणि शिरसाठ यांनी केले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Shirur News : कान्हूर मेसाई येथे मोकाट कुत्र्यांचा मोरावर हल्ला ; प्राणीमित्राच्या प्रयत्नांनी जखमी मोराला जीवनदान

Shirur News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिक्षकांचे प्रलंबीत प्रश्न सोडविणार – राज्य शिक्षक संघाचे नेते संभाजी थोरात यांची माहिती

Shirur News : तंत्रज्ञानाला अध्यात्माची जोड दिल्यास गावाचा विकास शक्य; जे.आर.डी. टाटा उद्योग पुरस्कार सोहळ्यात पोपटराव पवार यांचे मत

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

5.5 वर्षे पगारच नाही! पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूट वादात; शिक्षकांचे वेतन थकवल्याप्रकरणी संस्थापकासह 7 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 10:55

शेतातील ट्रान्सफॉर्मर फोडून 40 किलो तांब्याच्या कॉइलची चोरी; शिरूरमध्ये खळबळ

Saturday, 4 July 2026, 10:33

‘शेतात सोन्याचा हंडा सापडला’ म्हणत विकली 1,000 नाणी; 5 लाख दिल्यानंतर पिशवी उघडताच वाहनचालकाला बसला धक्का

Saturday, 4 July 2026, 10:25

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40
Next Post

Pune News : संतापजनक! जन्मदात्या आईच्या डोक्यात दगड घालून केले गंभीर जखमी; मुलावर गुन्हा दाखल!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.