Pune News : पुणे : मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवले पूल परिसरात अपघातांचे सत्र सुरूच आहे. बाह्यवळण मार्गावरुन सिमेंट वाहतूक करणारा ट्रक नवले पुलाजवळ उलटला. ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. अपघातात एक दुचाकी व मोटारीचे नुकसान झाले. दुचाकीस्वार, मोटारचालकास किरकोळ दुखापत झाली. ट्रक उलटल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. सुदैवाने या घटनेत कोणीही गंभीर जखमी झाले नाही. नवले पुलावर अपघाताच्या घटना वाढीस लागल्याने महामार्ग प्राधिकरण, वाहतूक पोलीस सातत्याने विविध उपाययोजना करत आहेत.
वाहतूक विस्कळीत
दरम्यान, अपघाताची माहिती मिळाल्यानंतर भारती विद्यापीठ, सिंहगड रस्ता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. (Pune News) क्रेनच्या सहायाने ट्रक पूर्ववत केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
बाह्यवळण मार्गावरील दरी पूल ते नवले पूल दरम्यान तीव्र उतार असल्याने भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनचालकांचे नियंत्रण सुटून अपघाताच्या घटना घडल्याने पोलिसांनी वेगमर्यादा निश्चित केली आहे. (Pune News) दरीपूल ते नवले पूल दरम्यान वेगमर्यादेबाबतचे फलक लावण्यात आले आहेत. वाहनांचा वेग कमी ठेवण्यासाठी ठिकाठिकाणी वेग कमी करणाऱ्या पट्ट्या लावण्यात आल्या (रम्बलिंग स्ट्रीप) आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News :आर्मी मध्ये भरती करण्याचे आमिष दाखवणारा आरोपी ताब्यात; 1 कोटी ८० लाखाची फसवणूक