Pune News : पुणे : विमान प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लोहगाव विमानतळावरील रन वे लायटिंगचे काम पूर्णत्वास आल्यामुळे येथून २४ तास विमान वाहतूक शक्य झाली आहे. लोहगाव विमानतळावर सुरु असलेले नवीन टर्मिनलचे काम देखील आता अंतिम टप्प्यात आले असून ऑक्टोंबरमध्ये नवीन टर्मिनल सुरु होणार आहे. तब्बल ५२५ कोटी रुपये खर्च करुन हे टर्मिनल उभारले आहे.
रोज ३३ हजार प्रवाशी करू शकतील प्रवास…
नवीन टर्मिनलची चाचणी यशस्वी झाल्यामुळे ऑक्टोंबर २०२३ पासून हे विमानतळ सुरु होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान कार्यालयाकडूनही याची वेळोवेळी माहिती घेतली जात आहे. (Pune News) सर्व विमान कंपन्यांच्या एअरलाईनची बैठक देखील झाली. यामुळे ऑक्टोबर महिन्यापर्यंत हे टर्मिनल सुरु करण्यासंदर्भात हालचाली सुरु आहेत.
नवीन टर्मिनलमध्ये पाच एरोब्रिज असून, टेकऑफ आणि लॅण्डींगसंदर्भात अनेक सुविधा आहेत. नवीन टर्मिनलवरुन रोज १२० विमाने जातील. तसेच रोज सुमारे ३३ हजार प्रवाशी प्रवास करु शकतील. (Pune News) या टर्मिनलसाठी ५२५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
नवीन टर्मिनल ६० हजार स्केअर फुटावर उभारले आहे. नवीन टर्मिनलमध्ये लगेजसाठी नवीन प्रणाली तयार केली आहे. मुलांच्या खेळण्यासाठी जागा आहे आणि रेस्टॉरंटही आहे. (Pune News) इमारतीवर गर्दीवर नियंत्रणासाठी सेन्सर बसवण्यात आले आहेत. पुणे विमानतळावर ५१ वर्षांनंतर या पद्धतीचे काम केले आहे. नवीन टर्मिनल सुरु झाल्यानंतरही जुन्या टर्मिनलचाही वापर करण्यात येणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : ‘डीएसकेडीएल’चे अस्तित्व संपुष्टात; अडीच कोटींच्या समभागांची किंमत शून्य