Pune News : पुणे : बंद पडलेली ‘डाक जीवन विमा योजना’ ग्राहकांना आता विलंब शुल्क न भरता पुन्हा सुरु करता येणार आहे, अशी माहिती पुणे जिल्हा (ग्रामीण) डाकघर विभागाचे अधीक्षक बाळकृष्ण एरंडे यांनी दिली.
३० नोव्हेंबरपर्यंत मुदत
भारतीय टपाल विभागाने डाक जीवन विमा आणि ग्रामीण डाक जीवन विमा पॉलीसी धारकांसाठी उत्तम संधी उपलब्ध करून दिली आहे. ज्या ग्राहकांची डाक जीवन विमा पॉलीसी कोणत्याही कारणास्तव बंद होण्याच्या मार्गावर आहे, त्यांना ती पुनरुज्जीवन करण्याची संधी देण्यात आली आहे. (Pune News) यामध्ये पॉलीसी धारकाला कुठलाही विलंब शुल्क देण्याची आवशकता नाही, अशी अधिसूचना नवी दिल्ली येथील निदेशालय डाक जीवन विमा विभागाच्या वतीने परिपत्रकाद्वारे जारी केली आहे.
दरम्यान, कोरोना महामारीमुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे तसेच आर्थिक संकटामुळे ग्राहकांना त्यांचा डाक जीवन विमा सुरु ठेवता आला नाही (Pune News) तसेच तीन-चार हप्ते भरल्यानंतर ग्राहक आर्थिक अडचणीमुळे विमा पुढे चालू ठेवू शकले नाहीत, अशा ग्राहकांना केंद्र सरकारच्या या सुविधेमुळे ३० नोव्हेंबरपर्यंत कोणत्याही विलंब शुल्काशिवाय ही योजना पुन्हा सुरू करता येणार आहे.
याबाबत बोलताना बाळकृष्ण एरंडे म्हणाले की, ग्राहकांच्या अडचणी समजून घेऊन शासनाने ही सुविधा सुरु केली आहे. नागरिकांनी बंद पडलेली खाती त्वरित सुरु करून या योजनेचा लाभ घ्यावा, (Pune News) असे आवाहन एरंडे यांनी या वेळी केले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : सोन्याची भुकटी असलेल्या कॅप्सुलची तस्करी; लोहगाव विमानतळावरून दोन अधिकाऱ्यांना अटक
Pune News : पुण्यातील तीन गुंडांच्या तडीपारीचे आदेश; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा दक्ष