Pune News : पुणे : पुण्यात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असल्याची चर्चा सतत होत असते. मागील दोन महिन्यांत घडलेल्या घटनांवरून ही बाब अधोरेखित होत आहे. मंगळवारी (ता. २६) अशीच एक घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे माजी नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी काल एका रिक्षाचालकाला शिविगाळ करत बेदम मारहाण केली आहे. मारहाणीची घटना बाणेर-सुस रोडवर घडली. या मारहाणीचा व्हिडिओ शूट करून एका नागरिकाने सोशल मिडियावर व्हायरल केल्यामुळे पुण्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. याबाबत अद्याप कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. मात्र, चांदेरे यांनी सत्तेत येताच मुजोरी सुरू केल्याचा आरोप विरोधक करत आहेत.
सत्तेत येताच मुजोरी सुरू केल्याचा आरोप
पुण्यात काल संततधार पाऊस पडत होता. यामुळे शहरातील सर्वच रस्ते वाहतूक कोंडीने व्यापले होते. वाहतूक सुरळीत करत असताना रिक्षाचालकाने चुकीच्या दिशेने गाडी वळवली. (Pune News)या वेळी चांदेरे यांनी रिक्षाचालकाला शिवीगाळ करत मारहाण केली. बाणेर-सुस रोडवर ही घटना घडली. चांदेरे हे पुणे महानगरपालिकेचे तीन टर्म नगरसेवक होते. या कार्यकाळात त्यांनी स्थायी समिती पद भूषवले आहे. पुण्यातील श्रीमंत नगरसेवक म्हणूनही चांदेरे ओळखले जातात. पैसा व सत्तेमुळे हे वर्तन घडते, अशी चर्चा पुण्यातील राजकीय वर्तुळात होत आहे.
दरम्यान, पुण्यात काल दिवसभर पावसाची रिपरीप सुरूच होती. पावसामुळे रस्त्यावर पडलेले खड्डे, त्यातच वाहतूक कोंडी यामुळे वाहतूक नियमनासाठी मदत म्हणून नगरसेवक चांदेरे बाणेर रस्त्यावर थांबले होते. याच दरम्यान एक रिक्षाचालक रस्त्यावरून चुकीच्या मार्गाने रिक्षा आडवी घालत होता. (Pune News) ते पाहून चांदेरे यांनी त्याला अर्वाच्च भाषेत शिविगाळ करायला सुरूवात केली. रिक्षाचालकाने जाब विचारला असता, त्याला मारहाण देखील करण्यात आली. गर्दीतील एकाने या मारहाणीचा व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर अपलोड केला. व्हिडीओ व्हायरल झाल्यावर विरोधकांनी टीका केली असून, सत्तेचा माज आल्याने चांदेरे यांची मुजोरी वाढल्याचे विरोधक बोलत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : नात्यातील तरुणाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपीला २० वर्षे सक्तमजुरी!