Pune News : पुणे : पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन धावत्या ट्रेनमधून गुन्हेगार पळून गेल्याची घटना समोर आली आहे. ही घटना हावडा -पुणे दुरंतो एक्सप्रेसमध्ये नागपूर ते बुटीबोरी दरम्यान घडली.संजय तपनकुमार जाना (रा. गोपीनाथ भीतरजाल, प. बंगाल) असे या आरोपीचे नाव आहे. (The criminal escaped from the running train; Incident in Howrah Duronto Express)
हावडा दुरंतो एक्सप्रेसमधील घटना
मिळालेल्या माहितीनुसार, फरासखाना पोलीस ठाण्यात ६ मे रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय जाना व सौरभ प्रसन्नजीत माईती हे दागिने घडविणार्या व्यवसायिकाकडे कामगार म्हणून काम करत होते. दागिने घडविण्यासाठी दिलेले ३८१ ग्रॅम सोने घेऊन पळून गेले होते.(Pune News) पुणे पोलिसांचे पथक त्यांना पकडण्यासाठी पश्चिम बंगालला गेले होते. संजय जाना याला घेऊन फरासखाना पोलिसांचे पथक पुण्याकडे हावडा – पुणे दुरंतो एक्सप्रेसच्या बी -८ कोचमध्ये बसवून पोलीस पुण्याकडे येत होते.
नागपूरहून शुक्रवारी दुपारी २.३० च्या सुमारास रेल्वेगाडी बुटीबोरीकडे असताना गुमगावजवळ त्याने बाथरुमला जायचे आहे, असे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी त्याला टॉयलेटजवळ नेले. आरोपी संजयने आतून दार बंद केले. बराच वेळ होऊनही तो बाहेर येण्याचे नाव घेत नसल्याने पोलिसांनी टॉयलेटचे दार ठोठावले. आतून प्रतिसाद मिळत नसल्याने पोलिसांना शंका आली. त्यानंतर कसेबसे दार उघडले असता आरोपी टॉयलेटची खिडकीची काच तोडून उडी घेऊन पळून गेल्याचे स्पष्ट झाले. (Pune News) यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली.
नागपूर रेल्वे पोलिसांकडे याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : शाळेच्या पहिल्या दिवशी प्रत्येक विद्यार्थ्याला पुस्तक देण्यात येणार