Pune News : पुणे : पुणेकरांनी गणेशोत्सवाच्या तयारीला मोठ्या जल्लोषात सुरुवात केली आहे. यातच पुणे पोलिसांनी एक बातमी सांगितली आहे. जुलैमध्ये पुणे पोलिसांनी कोथरुड भागात दोन दहशतवादी पकडले होते. या पार्श्वभूमीवर आगामी गणेशोत्सवादरम्यान नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पुणे पोलिसांकडून करण्यात आले आहे. गणेशोत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी पुणे पोलिसांकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.
पोलीस काही दिवसांतच गणेशोत्सवाची नियमावली जाहीर करणार
पुण्यातील गणेशोत्सवाला मोठी परंपरा आहे. पुण्याचा गणेशोत्सव पाहण्यासाठी केवळ राज्यभरातूनच नाही तर देश-विदेशातून पाहुणे येत असतात. (Pune News) यामुळे गणेशोत्सवादरम्यान पुण्यात नागरिकांची प्रचंड गर्दी असते. या गर्दीचा फायदा घेऊन दहशतवादी कारवाया घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठीच पोलीस सतर्क झाले असून, नागरिकांनीदेखील खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
पुण्यात दगडूशेठ गणपती आणि मानाच्या गणपतींना जास्त प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे दरवर्षी पोलिसांना गणेशोत्सवादरम्यान मोठा बंदोबस्त तैनात ठेवावा लागतो. यावर्षी मात्र हा बंदोबस्त कडक असण्याची शक्यता आहे. कारण मागील काही दिवसांपासून पुण्यात घडणाऱ्या घटना आणि दहशतवाद्यांची असलेल्या भीतीमुळे यंदा पोलिसांनी कंबर कसली आहे. (Pune News) गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी देखील सुरक्षाव्यवस्थेची काळजी घेण्याच्या सूचना पोलीस आयुक्तांनी दिल्या आहेत. पोलीस आयुक्त रितेशकुमार स्वतः शहरातील गणपती मंडळांशी सुरक्षेसंदर्भात आढावा बैठक घेत आहेत.
पुण्यात कोथरुड परिसरात चोरीच्या गुन्ह्यात पकडलेल्या दोघांचा संपर्क इसिससारख्या देशविरोधी संघटनांशी असल्याचे समोर आले होते. त्यांच्या घराची झडती घेतली असता बंदूक आणि स्फोटके तसेच बॉम्ब बनवण्याचे साहित्य लिहिलेली चिठ्ठीदेखील सापडली होती. पुण्यातील कोंढवा परिसरात हे दोघं राहत होते. त्यानंतर पुण्यातील कोंढवा परिसरातूनच एका भूलतज्ञ असणाऱ्या डॉक्टरला इसिसमध्ये भरती करुन घेतो, या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. (Pune News) त्यामुळे पुण्यात खळबळ उडाली होती. याच पार्श्वभूमीवर पुण्यात गणेशोत्सवादरम्यान चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
दरम्यान, पुणे पोलिसांकडून काही दिवसांतच गणेशोत्सवाची नियमावली जाहीर करण्यात येणार आहे. त्यावेळी गणेश मंडळांनादेखील सूचना देण्यात येणार आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : सिंहगडावर जाण्यासाठी आता तिकीटासाठी रांग लावायची गरज नाही
Pune News : पुण्यात पकडला तब्बल ५ हजार किलो भेसळयुक्त पनीरचा साठा
Pune News : अल्पवयीन मुलाला फरशीने मारहाण; चौघांविरोधात गुन्हा दाखल