Pune News : पुणे : गणपतीला वाहते दुर्वा
पांडुरंगाला वाहते तुळशी
अजितरावांचे नाव घेते
राष्ट्रवादीसोबत मंगळगौरीच्या दिवशी…
हा भन्नाट उखाणा घेतला आहे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी… सोशल मीडियावर सध्या हा उखाणा जोरदार चर्चेत आला आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पुण्यात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात सुनेत्रा पवार यांनी हा उखाणा घेतला.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या गृह विभागाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळणाऱ्या सुनेत्रा पवार यांची चर्चा माध्यमांमध्ये फारशी होत नाही. पत्नीला नेहमी पतीचा वेळ हवा असतो; परंतु अजित पवार राज्याच्या राजकारणात व्यग्र असल्याने, पत्नीसाठी पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत. तरिही, कोणतीही कुरबुर न करता अजित पवार यांच्या प्रत्येक निर्णयामागे सुनेत्रा पवार ठामपणे उभ्या असतात. मात्र, या भन्नाट उखाण्यामुळे सुनेत्रा पवार चर्चेत आल्या आहेत.
अजित पवार यांच्या पत्नीने घेतला उखाणा#AjitPawar pic.twitter.com/pOPnbRoLL0
— jitendra (@jitendrazavar) September 12, 2023
महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पुण्यात आयोजित केलेल्या मंगळागौर कार्यक्रमात विवाहित महिलांना उखाणा घेण्यास सांगण्यात आले. सुनेत्रा पवार यांचा नंबर आला त्यावेळी त्यांनी भन्नाट उखाणा घेतला. या उखाण्यास उपस्थित महिला श्रोत्यांनी उत्तम दाद दिला. या कार्यक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हा उखाणा अजित पवार यांच्यापर्यंत लाईव्ह कार्यक्रमातून पोहचल्याचे रुपाली चाकणकर यांनी सांगितले. त्यानंतर श्रोत्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.