Pune News : पुणे : कात्रज येथील संत रविदास मंदिर येथे चर्मकार ऐक्य परिषदेची बैठक रविवारी (ता. ५) ज्येष्ठ समाजसेवक गोंविदराव खटावकर (सांगली) यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीत विविध विषयांवर चर्चा करुन मार्ग काढण्यासाठी नियोजन करण्यात आले. भविष्यातील चर्मकार समाजाची अखंडता, अस्तित्व आणि अस्मिता कायम राहण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
कार्यकारिणी पुढीलप्रमाणे
● सूर्यकांत आप्पा गवळी – प्रदेशाध्यक्ष
● मीराताई शिंदे – महिला प्रदेशाध्यक्षा
● विजय घासे – संपर्क प्रमुख
● संजू बनसोड – गटई कामगार, प्रदेशाध्यक्ष
● गजानन लिंभोरे – युवक प्रदेशाध्यक्ष
● विठ्ठल धस – प्रदेश कार्याध्यक्ष
● दिनेश जाधव – प्रदेश उपाध्यक्ष
● सचिन यादव – प्रदेश महासचिव
● लहु बावीस्कर – प्रदेश प्रवक्ते
● सुरेखा दिघे – महिला प्रदेश कार्याध्यक्षा
● सुरेखा सुर्वे – महिला प्रदेश उपाध्यक्षा
● सुनिता कसबे – महिला प्रदेश प्रवक्त्या
● अनिकेत भोसले – प्रदेश युवक कार्याध्यक्ष
● तुळशीराम वाघमारे – प्रदेश सोशल मिडीया प्रमुख
● जालिंदर सोनवणे – कला व सांस्कृतिक समिती प्रमुख
या वेळी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून सुमारे २५० चर्मकार समाज बांधव उपस्थित होते. या वेळी सर्वांच्या एकमताने अखिल भारतीय रविदासिया धर्म, गुरु रविदास विश्व महापीठ व राष्ट्रीय गुरु रविदास क्रांती मोर्चा या तीन देश पातळीवर व जागतिक स्तरावर काम करणाऱ्या चर्मकारांच्या संघटनेला चर्मकार परिषदेचे “दीपस्तंभ” ठेवावेत व त्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन, सहकार्य घेत राहावे व त्यांना आपण महाराष्ट्रातून चर्मकार समाजाची ताकद देण्याचे ठरविण्यात आले. लवकरच आणखी कार्यकारिणी विस्तार करुन पदग्रहण सोहळा आयोजित केला जाईल, असे प्रतिपादन नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष सूर्यकांत गवळी यांनी केले.