Pune News : पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अनेक कारणांमुळे सातत्याने चर्चेत येत आहे. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाकरी फिरवणार असल्याचे सुतोवाच केले होते. त्याप्रमाणे नुकत्याच झालेल्या पक्षाच्या २४ व्या वर्धापनदिनी शरद पवार यांनी मोठी घोषणा केली. खासदार सुप्रिया सुळे आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावर कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या घोषणेनंतर ही घराणेशाही असल्याचा आरोप विरोधकांकडून सुप्रिया सुळे यांच्यावर करण्यात येत आहे. या आरोपाला जोरदार प्रत्युत्तर देत, सुप्रिया सुळे यांनी आरोपाचे खंडन केले आहे. (Supriya Sule reprimands those who accuse of nepotism; She said, I want Parliament…)
सोयीप्रमाणे तुम्ही माझ्यावर घराणेशाहीचा आरोप करता
प्रसारमाध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, “देशात माझा पहिला क्रमांक येतो, तेव्हा माझे वडिल संसदेत पास करत नाहीत. मला सातत्याने संसदरत्न मिळते, तेव्हा तुम्हाला घराणेशाही दिसत नाही. सोयीप्रमाणे तुम्ही माझ्यावर घराणेशाहीचा आरोप करता. तुम्ही म्हणत असाल तर, होय, ही घराणेशाहीच आहे. (Pune News) माझा जन्म ज्या घरात झाला, त्याचा मला सार्थ अभिमान आहे. मी शरद पवार आणि प्रतिभा पवार याची मुलगी असल्याचाही मला सार्थ अभिमान आहे. आरोप करणाऱ्यांनी जरूर करावेत. आरोप करणाऱ्या पक्षातील घराणेशाही संसदेत आकडेवारीसह दाखवली आहे. त्यामुळे एक बोट माझ्याकडे केल्यावर तीन बोटं त्यांच्याकडे असतात.”
विरोधकांना सुप्रिया सुळेंनी या शब्दांत खडसावलं आहे. शिवाय मला मला शरद पवार आणि प्रतिभा पवार यांची मुलगी असल्याचा सार्थ अभिमान आहे, असंही त्यांनी सांगितलं. (Pune News) सुप्रिया सुळे पुण्यात माध्यमांशी बोलत होत्या. या वेळी बोलताना त्या म्हणाल्या की, मी प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार यांना रिपोर्ट करणार आहे. तर, महाराष्ट्रात छगन भुजबळ, अजित पवार आणि जयंत पाटील यांना रिपोर्ट करणार आहे.
माझ्या कामाचा देशात पहिला क्रमांक येतो, तेव्हा माझे वडिल संसदेत पास करत नाहीत. (Pune News) माझ्या कार्याची पावती म्हणून मला सातत्याने संसदरत्न मिळते, तेव्हा कोणालाच घराणेशाही दिसत नाही. याचाच अर्थ प्रत्येकजण आपल्या सोयीनुसार घराणेशाहीचा अर्थ लावताना दिसते, अशा शब्दांत विरोधकांना सुप्रिया सुळेंनी खडसावलं आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : येरवडा-कल्याणीनगर परिसरातील एलिफंट अॅन्ड को. रेस्टॉरंट अॅन्ड बारवर पोलिसांची कारवाई
Pune News : आनंदाची बातमी! मान्सूनची महाराष्ट्रात एन्ट्री; ‘या’ भागात पावसाची हजेरी
Pune News : पुणे-मुंबई सिंहगड एक्सप्रेसमध्ये अतिरिक्त दोन द्वितीय श्रेणी चेअर कारचे डबे