Pune News : पुणे : पुणे ग्रामीण पोलिसांच्यावतीने ‘संकल्प नशा मुक्ती’ अभियानाअंतर्गत रविवारी लोणावळा शहरात विशेष मॅरेथॉनचे आयोजन केले आहे. या मॅरेथॉनमध्ये प्रसिध्द सिने अभिनेता सुनील शेट्टी सहभागी होणार आहे, अशी माहिती लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी सत्य साई कार्तिक यांनी दिली. (Sunil Shetty’s run in Pune on Sunday for Sankalp Nasha Mukti)
लोणावळा शहरामध्ये मॅरेथॉनचे आयोजन
प्रबोधनाच्या कार्यक्रमांर्गत रविवारी (४ जून) रोजी लोणावळा शहरामध्ये मॅरेथॉन आयोजिली आहे. तीन गटामंध्ये ही स्पर्धा होत असून पहिल्या गट १६ ते १८. दुसरा गट १९ ते २५ आणि २५ च्या पुढे अशा गटात ही स्पर्धा होणार आहे. मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसाच्या वेबसाईटवर लिंक देण्यात आली असून जास्ती जास्त नागरिकानी (Pune News) यात सहभागी व्हावे असे आवाहन लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी सत्य साई कार्तिक यांनी केले.
लोणावळा शहरात पर्यटनाच्या निमित्ताने राज्यभरातील तरुणाई गर्दी करते त्याचाच गैरफायदा घेत येथे ड्रग्जचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावत आहे. तो मुळासकट उपटून काढण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसानी पुणे पोलिस अधिक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शानाखाली ‘ संकल्प नशा मुक्ती’ विशेष अभियान राबविले आहे. त्यामध्ये गुन्हेगारांवर (Pune News) कारवाई, तरुणांचे प्रबोधन, आणि व्यसनाच्या आहारी गेलेल्यांचे पुनर्वसन अशा तीन मुद्यांवर पोलिस काम करत आहेत. त्यासाठी अभिनेता सुनील शेट्टी हे ब्रॅड ॲम्बेसिडर म्हणून इनिशियेटिव्ह घेत आहेत.
तरुणाईला लागलेली कीड म्हणजे ड्रग्ज आहे त्यातून त्यांची सुटका करणे आणि त्या व्यसनाच्या जाळ्यात अडकण्यापासून तरुणाईला रोखणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी ‘ संकल्प नशामुक्ती’ हे अभियान सुरु आहे (Pune News) त्यासाठी अभिनेता सुनील शेट्टी इनिशियेटिव्ह घेत आहेत आपण सर्वानीही यात सहभागी व्हावे आणि रविवारी होणाऱ्या दौड मध्ये सहभागी व्हावे. – अंकित गोयल, पोलिस अधिक्षक, पुणे ग्रामीण.
मॅरेथॉनसाठी मोफत रजिस्ट्रेशन (लिंक अशी)
येत्या रविवारी लोणावळा येथील दाउदी बोहरा ग्राउंड येथे सकाळी सहा वाजता ही मॅरेथॉन सुरु होणार आहे. सहभागी होणाऱ्या प्रत्येकासाठी टी शर्ट, रिफ्रेशमेंट देण्यात येणार आहे. (Pune News) मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांच्या वेब साईटवर रजिस्ट्रेशन करणे आवश्यक असून रजिस्ट्रेशन मोफत आहे. त्याची लिंक अशी – https://puneruralpolice.gov.in/