Pune News : पुणे : आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल फोन आणि इंटरनेटचा बोलबाला सुरू आहे. सोशल मीडियावर ऑनलाईन गेम, जाहिरातींच्या माध्यमातून तरुणाईला जाळ्यात ओढण्यासाठी हरप्रकारे प्रयत्न सुरू असतात. कमी वेळेत जास्त पैसा कमवायच्या नादात तरुणाई अशा प्रकारच्या ऑनलाईन गेमला बळी पडते. अशीच एक धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातून समोर आली आहे. ऑनलाइन जंगली रमीमध्ये २० हजार रुपये हरला म्हणून एका तरुणाने गळफास घेऊन स्वतःचे जीवन संपविले आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
तळेगाव दाभाडे येथील घटना
पुण्याच्या तळेगाव दाभाडेमध्ये ही धक्कादायक घटना घडली. गणेश सोमनाथ काळदंते (वय ३२, रा. तेली आळी, तळेगाव दाभाडे) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. गणेश हा कॅब चालक होता. गणेशला त्याच्या भावाने कार घेऊन दिली होती. मात्र, त्यांना कॅब सर्विसमधून चांगले उत्पन्न मिळत नव्हते. (Pune News) पैशांची चणचण भासत असल्याने तो मोबाईलवर जंगली रमी हा खेळ खेळ होता. त्यामध्ये तो काही रक्कम हरला. यातून आलेल्या नैराश्यातून त्याने आत्महत्या केली. जंगली रमीबरोबरच त्याला मद्यपान करण्याचं व्यसन होतं, अशी माहिती तळेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने यांनी दिली आहे.
व्यवसायात मिळणारे कमी उत्पन्न आणि रमी खेळात पैसे हरल्याने आलेल्या आर्थिक विवंचनेतून गणेशने रविवारी घरात सर्वजण असताना स्वतःच्या बेडरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. रात्री गणेश बाहेर का येत नाही म्हणून दरवाजा ठोठावला. पण, प्रतिसाद मिळत नसल्याने दरवाजा तोडला, तेव्हा त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे निदर्शनास आले. (Pune News) त्यांनी गणेशला सोमाटणे फाटा येथील पवना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. गणेश याला दोन मुले आहेत. दरम्यान, घडलेल्या घटनेचा तळेगाव दाभाडे पोलीस अधिक तपास करीत आहेत.
ऑनलाइन गेमिंगमध्ये तरुणाई का ओढली जाते?
विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल आणि इंटरनेटचे जाळे जगभर पसरले आहे. त्यामुळे कुमारवयीन मुले, तरुण जास्तीतजास्त वेळ मोबाईलवर घालवताना दिसत आहेत. (Pune News) मैदानी खेळापासून ही पिढी दूर जात आहे. पूर्वी मुले मैदानात क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, हॉकी, कबड्डी खेळताना दिसायची. आता मुले ऑनलाइन गेम खेळण्यात व्यग्र असलेली दिसतात. याचा चुकीचा परिणाम मुलांच्या मानसिकतेवर होत असल्याचे स्पष्ट होत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : महाराष्ट्राचा शैक्षणिक दर्जा घसरला; थेट सातव्या श्रेणीपर्यंत घसरण