Pune News : पुणे : वाढत्या महागाईमुळे आधिच नागरिकांचे कंबरडे मोडलेले असताना शाळांचा भरमसाठ फी वाढली आहे. त्यामुळे घरखर्च भागवणे पालकांच्या आवाक्याबाहेर जाते. त्यामुळे अनेकदा विद्यार्थ्यांनी फी थकते. यावरुन शाळा व्यवस्थापन आणि पालकांचे खटके उडाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशीच एक घटना पुण्यातून समोर आली आहे. (Students of a school in Pune expelled for non-payment of fees)
पहिल्याच दिवशी मुलांना वर्गाबाहेर काढण्यात आले
पुण्यातल्या नामांकित शाळेत दहावीचे एक्स्ट्रा वर्ग आजपासून सुरू झाले. (Pune News) पण फी न भरल्याने पहिल्याच दिवशी शाळेतून मुलांना वर्गाबाहेर काढण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
शाळा व्यवस्थापनाने मुलांना वर्गाबाहेर ठेवल्याचे लक्षात येताच पालकांनी शाळेत जात जाब विचारला. स्थानिक राष्ट्रवादी नेते नितीन कदम यांनी देखील शाळेत जात व्यवस्थापनाला जाब विचारला.
जवळपास 150 मुलांना काढले बाहेर काढण्यात आले होते. यावेळी पालकांना शाळेत जात तेथील सुपरव्हायझर्सना जाब विचारला. त्यावेळी त्यांनी आम्हाला वरुन जो आदेश आहे, (Pune News) त्याची आम्ही फक्त अंमलबजावणी केल्याचं म्हटलं. यानंतर पालकांनी आणखी संताप व्यक्त केला. पालकांनी गोंधळ घातल्यावर शाळेने सामोपचाराची भूमिका घेतली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :