Pune News : पुणे : इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन म्हणजेच “आयआरसीटीसी’च्या बेवसाइटवरून आता एसटी महामंडळाच्या बसचे तिकीट बूक करता येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. यासाठी दोन्ही प्रशासनंतर विशेष करार करण्यात आला आहे.
प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार
एसटी महामंडळाची ऑनलाइन बस बुकिंग सेवा सक्षम करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच प्रवाशांसाठी ही सुविधा सुरू केली जाणार आहे. (Pune News) रेल्वेतून प्रवास करणारे ७५ टक्क्यांपेक्षा अधिक प्रवासी वेबसाइटवरून तिकीट बुक करतात. या प्रवाशांना आता एसटीचा पर्यायदेखील उपलब्ध होणार आहे. वापरकर्त्यांचा प्रवास अधिक सोयीस्कर बनवण्यासाठी हा प्रयत्न करण्यात आला आहे.
“आयआरसीटीसी’च्या संकेतस्थळावर खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांसह विमानसेवेचेही तिकीट बुक करता येते. शिवाय कनार्टक, तमिळनाडू आदी राज्यांच्या परिवहन सेवेची तिकिटेही येथून बुक करता येऊ शकतात, पण तंत्रज्ञान वापरात पिछाडीवर असलेल्या एसटी महामंडळाने यातही कासवगती कायम ठेवली आहे. (Pune News) प्रवाशांना ‘आयआरसीटीसी’ची अधिकृत वेबसाइट https://www. bus.irctc.co.in/ या वरून प्रवाशांना हे तिकीट बुक करता येईल.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : बंद पडलेली ‘डाक जीवन विमा’ योजना ग्राहकांना विलंब शुल्काविना सुरु करता येणार
Pune News : सोन्याची भुकटी असलेल्या कॅप्सुलची तस्करी; लोहगाव विमानतळावरून दोन अधिकाऱ्यांना अटक
Pune News : पुण्यातील तीन गुंडांच्या तडीपारीचे आदेश; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा दक्ष