अमोल दरेकर
Pune News : पुणे : विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी खेळ आवश्यक आहे. शालेय क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. आधुनिक काळात प्रचंड स्पर्धा असून, त्यात टिकायचे असेल तर शारीरिक क्षमता विकसित होणे गरजेचे आहे, असे मत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी व्यक्त केले.
शिरूर येथे कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन
जिल्हा क्रीडा परिषद व अजिंक्यतारा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिरूर तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या निमित्ताने ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरूर तालुका क्रीडा संघटनेचे अध्यक्ष शरद दुर्गे होते. कार्यक्रमाच्या निमित्ताने शिरूर तालुक्याचे गटविकास अधिकारी महेश डोके विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना म्हणाले की (Pune News) आधुनिक जीवनशैलीत विद्यार्थ्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊन पारंपारिक व्यायामाची सवय अंगिकारली पाहिजे. आपल्या आहारात जंकफूडचा अतिवापर टाळून, पौष्टिक व निरोगी आहार घेण्याचा विचार करणे गरजेचे असल्याचे देखील डोके यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये खरी उपयोगिता व बुद्धीकौशल्य आहे. ती उपयोगिता व बुद्धीकौशल्य विकसित करण्याचे उत्कृष्ट काम शिक्षक करत असल्याचे मत जिल्हा परिषद सदस्या रेखा बांदल यांनी व्यक्त केले. बांदल यांनी स्पर्धेच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल आयोजकांना धन्यवाद दिले. शिरूर तालुक्याचा क्रिडा संकुलाचा प्रश्न कित्येक दिवस प्रलंबित असून, (Pune News) तो सोडविण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज या वेळी संघटनेचे अध्यक्ष शरद दुर्गे यांनी बोलून दाखवली. उपस्थितांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. कबड्डी स्पर्धेत तालुक्यातील १३८ संघांनी भाग घेतला होता. तालुक्यातील वेगवेगळ्या विद्यालयांतील क्रीडा शिक्षक या वेळी उपस्थित होते. पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या पंचांनी स्पर्धा सुरळीत पार पाडण्यासाठी मदत केली.
कार्यक्रमाला सभापती सुभाष उमाप, अजिंक्यतारा प्रतिष्ठानचे प्रमुख व पुणे जिल्हा कुस्तीगार संघाचे अध्यक्ष रामभाऊ सासवडे, शिक्रापूर नगरीचे सरपंच रमेश गडदे, अजिंक्यतारा प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब कापरे,अनिल काशिद, सामाजिक कार्यकर्ते जयाभाऊ विरोळे, शिरूर तालुका कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष झेंडू पवार, (Pune News) महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे ग्रामीणचे उपाध्यक्ष प्रा. जितेंद्रकुमार थिटे, शिरूर तालुका क्रीडा संघटनेचे उपाध्यक्ष कैलासराव खंडागळे, ज्येष्ठ क्रीडा शिक्षक बाबूराव साकोरे, ईश्वर तावरे, दादासाहेब उदमले, मल्हारी उबाळे, कांतीलाल धुमाळ, सुनिल जाधव, नामदेवराव कंठाळे, प्राचार्य अविनाश क्षीरसागर, पै. महेश सासवडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश चव्हाण, उपप्राचार्य तुषार रूके यांनी केले, तर आभार प्राचार्य संतोष मासळकर यांनी मानले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : विमाननगर परिसरात दहशत माजविणाऱ्या टोळीवर मकोका; पुणे पोलिसांची मोठी कारवाई